एक्स्प्लोर

IND vs AUS, World Cup 2023: विश्वचषकात आज कांगारुंशी सलामी, गिलबाबत अनिश्चितता; 12 वर्षांपासूनचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडिया मैदानात

IND vs AUS: टीम इंडिया आज (8 ऑक्टोबर) पासून आपल्या विश्वचषकातील मोहीमेला सुरुवात करत आहे. वर्ल्ड कप 2023 मध्ये आज टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.

World Cup 2023: विश्वचषक 2023 स्पर्धेतील (ODI World Cup 2023) टीम इंडियाच्या (Team India) मोहिमेला आजपासून चेन्नईत सुरुवात होत आहे. टीम इंडिया (Indian Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर ही लढाई रंगणार आहे. या दिवसरात्र सामन्यात भारतीय सलामीवीर शुभमन गिलचा सहभाग अनिश्चित आहे. गिलला डेंग्यूचं निदान झाल्यानं तो या सामन्यात खेळणार नसल्याचे संकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मानं दिले आहेत. अलिकडेच भारतात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियानं 2-1 नं विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. असं असलं तरीही ऑसी टीमची लढाऊ वृत्ती त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय संघ नक्कीच करणार नाही, हे निश्चित. भारतीय फलंदाजी आणि कांगारुंची गोलंदाजी यात प्रामुख्यानं द्वंद्व रंगताना पाहायला मिळणार आहे.

भारतीय क्रिकेट संघानं शेवटचा विश्वचषक 2011 मध्ये जिंकला होता. त्यानंतर दोन विश्वचषक होऊन गेले, पण टीम इंडियाचे हात रिकामेच राहिले. मात्र, यावेळी विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे आहे. अशातच मायभूमीवर होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत 12 वर्षांनंतर पुन्हा विजेतेपदाकडे लक्ष लागलं असून हे लक्ष्य गाठण्यासाठी त्याची मोहीम आजपासून (8 ऑक्टोबर) सुरू होत आहे.

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियापेक्षा ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा

आज भारतीय क्रिकेट संघ पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा आजचा सामना विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघाविरुद्ध होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ आज ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. हा सामना चेन्नईतील चेपॉक येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. 

भारतीय क्रिकेट संघानं काही दिवसांपूर्वी एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत कांगारूंपेक्षा भारतीय खेळाडूंचं मनोबल अधिक भक्कम असेल. सध्या भारतीय क्रिकेट संघ आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला एकदिवसीय क्रिकेट संघ आहे. दरम्यान, आजचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. चेन्नईतील चेपॉकवर परदेशी संघानं सामने जिंकणं अशक्य असल्याचं बोललं जातं. 

विश्वचषकातील पहिल्या सामन्यात कशी असेल प्लेईंग 11? 

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिल आजच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता आहे. शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात गिल खेळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात गिलऐवजी ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. चेपॉकची खेळपट्टी स्पिनर्ससाठी अनुकूल मानली जाते, त्यामुळे टीम इंडिया आजच्या सामन्यात तीन स्पिनर्ससह मैदानात उतरणार आहे. म्हणजेच, जाडेजा आणि कुलदीप यादव यांच्यासोबत आर अश्विनही प्लेइंग-11 मध्ये असू शकतो. 

टीम इंडिया (संभाव्य प्लेईंग-11)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल/ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. 

ऑस्ट्रेलिया (संभाव्य प्लेईंग-11)

मार्कस स्टोयनिस अद्याप पूर्णपणे रिकव्हर झालेला नाही. अशातच त्याच्याऐवजी कॅमरुन ग्रीनला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), जोश हेजलवुड, एडम जम्पा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget