(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND W vs PAK W : भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार, टी 20 वर्ल्ड कपमध्ये हायव्होल्टेज लढत, हरमनप्रीत कौरपुढं करो वा मरो स्थिती
IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार आहेत. टी 20 वर्ल्ड कपमधील पहिली लढत पाकिस्ताननं जिंकली आहे.
Womens T20 World Cup 2024 IND vs PAK दुबई: भारत आणि पाकिस्तान आज पुन्हा आमने सामने येणार आहेत. दुबईत सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं. महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. भारत आणि पाकिस्तान यांनी टी 20 वर्ल्ड कपमध्ये एक एक मॅच खेळली आहे. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेला पराभव स्वीकारावा लागला तर पाकिस्ताननं श्रीलंकेला पराभूत करत विजय मिळवला. आज दोन्ही संघ आमने सामने येत आहेत. आजच्या लढतीत कोण विजय मिळवणार याकडे लक्ष लागलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता ही मॅच सुरु होईल. तर, नाणेफेक दुपारी तीन वाजता होणार आहे.
आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा आमने सामने येत आहेत. दोन्ही संघांनी टी 20 वर्ल्ड कपमध्ये एक एक मॅच खेळली आहे. भारताला न्यूझीलंडविरुद्ध 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्या मॅचमध्ये भारताच्या फलंदाजांना दमदार कामगिरी करताना अपयश आलं होतं. पाकिस्ताननं पहिल्या मॅचमध्ये श्रीलंकेवर 31 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळं आजच्या मॅचमध्ये भारतापुढं पाकिस्तानचं मोठं आव्हान असेल. भारतासह अ गटात न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका या संघांचा समावेश आहे. पुढच्या फेरीत जाण्यासाठी भारताला आज मोठा विजय मिळवावा लागेल. तर, स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी किमान विजय मिळवणं तरी आवश्यक असेल.
मॅच कुठं पाहणार?
आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच टीव्हीवर स्टार स्पोर्टसच्या चॅनेलवर पाहायला मिळतील. तर, मोबईलवर ही मॅच पाहायची असल्यास हॉटस्टारवर पाहता येईल.
भारताचा संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटिल , संजना सजीवन
पाकिस्तानचा संघ
फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाज, डायना बेग, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नशरा सुंधू, निदा डार, ओमैमा सोहेल, सदफ शमास, सादिया इकबाल , सिदरा अमीन, सय्यदा अरूब शाह, तस्मिया रुबाब, तुबा हसन
इतर बातम्या :
Women T20 World Cup : ऑस्ट्रेलियाचा विजय अन् टीम इंडियाच्या आशांना मोठा धक्का! सेमीफायनलमधून बाहेर?