सिकंदर रझाची एकाकी झुंज, भारतापुढे 153 धावांचे आव्हान
झिम्बाब्वेची धावसंख्या 15 षटकांत 100 धावांपर्यंत पोहोचली होती, पण कर्णधार माघारी परतल्यानंतर धावसंख्येला लगाम लागला.
IND vs ZIM : चौथ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेने 20 षटकात 152 धावांपर्यंत मजल मारली. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझा यानं सर्वाधिक 46 धावांची खेळी केली. इतरांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. चांगली सुरुवात मिळल्यानंतरही झिम्बाब्वेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताकडून खलील अहमद यानं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. भारताला मालिका विजयसाठी 153 धावांच गरज आहे.
भारताचा कर्णधार शुभमन गिल यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून आवेश खान याला आराम देण्यात आला. तुषार देशपांडेनं टीम इंडियासाठी आज पदर्पण केले. तर यजमान झिम्बाब्वेकडून वेलिंगटन मसाकादजा याच्या जागी फराज़ अकरम याल प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने 28 चेंडूत 46 धावा केल्या. झिम्बाब्वेची धावसंख्या 15 षटकांत 100 धावांपर्यंत पोहोचली होती, पण कर्णधार माघारी परतल्यानंतर धावसंख्येला लगाम लागला.
झिम्बाब्वेला मिळाली शानदार सुरुवात -
प्रथम फंलदाजी कऱणाऱ्या झिम्बाब्वेला शानदार सुरुवत मिळाली. वेसली मधेवेरे आणि तादिवानाशे मारुमनी यांनी शानदर सुरुवात दिली. आठ षटकत दोघांनी 58 धावा जोडल्या. पण नवव्या षटकत अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिली विकेट घेत ही जोडी फोडली. अभिषेक शर्माने मारुमानील 32 धावांवर बाद केले. त्यानंतर लगेच जम बसलेला मधेवेरेही मोठा फटका मारण्याच्या नादत 25 धावांवर बाद झाला.
सिकंदर रझ-मायर्सची झुंज -
चांगल्या सुरुवातीनंतर झिम्बाब्वेच्या धावसंख्येला खिळ बसली होती. कर्णधार सिकंदर रझा यानं कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली. त्यानं आधी ब्रायन बॅनेटसोबत 25 धावांची भागिदारी केली. त्यानंतर मायर्ससोबत डावाला आकार दिला. दोघांनी 45 धावांची भागिदारी केली. सिकंदर रझाने 28 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि दोन चौकार ठोकले. झिम्बाब्वेकडून फक्त सिकंदर रझा यालाच षटकार मारता आले. मायर्सने 12 धावांची खेळी केली.
भारताची गोलंदाजी कशी राहिली ?
डेथ ओव्हर्समध्ये टीम इंडियाने शानदार कमबॅक केले. सिकंदर रझा बाद झाल्यानंतर झिम्बॉब्वेचा डाव कोसळला. भारताकडून खलील अहमद सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. खलील अहमद यनं 4 षटकात 24 धावांच्या मोबदल्यत दोन विकेट घेतल्य. तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा, शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. रवि बिश्नोईच्या विकेटची पाटी कोरीच राहिली.