(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs WI: ईशान किशन की संजू सॅमसन? पहिल्या वनडेसाठी अशी असेल भारताची प्लेईंग 11
IND vs WI 1st ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.
India vs West Indies 1st ODI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. 27 जुलैपासून तीन सामन्याच्या वनडे मालिकाला सुरुवात होणार आहे. वनडे मालिकेत विकेटकिपर म्हणून कुणाला संधी दिली जाणार ? संजू सॅमसन की इशान किशन दोघांपैकी एकाच खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाची प्लेईंग ११ मध्ये कोण कोण असेल.. पाहूयात..
रोहित शर्मा आणि शुभमन गिल करणार डावाची सुरुवात
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल असेल, यात शंकाच नाही. त्यामुळे यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे बेंचवर बसतील. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळेल. गेल्या काही दिवसांत शुभमन गिलने एकदिवसीय सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने द्विशतक झळकावले आहे. रोहित शर्मा आणि गिल सलामीला उतरणार तर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळेल.
विकेटकिपर कोण? संजू की इशान
चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला खेळवणार, हेही जवळपास निश्चित झाले आहे. सूर्याला आशिया चषक संघात स्थान मिळवण्याची संधी असेल. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे त्याला वनडे संघात संधी मिळाली. जर सूर्याने या मालिकेत आश्चर्यकारक कामगिरी केली तर त्याला आशिया कप संघातही संधी मिळू शकते. यानंतर हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सहाव्या क्रमांकावर खेळेल, जो मॅच फिनिशरची भूमिका बजावेल. यानंतर फिरकीपटू रवींद्र जडेजा दिसणार आहे. हार्दिक, संजू आणि जाडेजा फिनिशरची भूमिका बजावतील.
गोलंदाज कोण कोण ?
कुलदीप यादव मुख्य स्पिनरच्या भूमिकेत दिसणार आहे. जडेजा आणि कुलदीप यादव फिरकीची जबाबदारी पार पाडतील. भारतीय संघाच तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश असू शकतो. यामध्ये शार्दुल ठाकूर, उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज दिसू शकतात.
पहले वनडेसाठी कसा असेल भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, उमरान मलिक आणि मोहम्मद सिराज.
India’s ODI Squad: Rohit Sharma (Capt), Shubman Gill, Ruturaj Gaikwad, Virat Kohli, Surya Kumar Yadav, Sanju Samson (wk), Ishan Kishan (wk), Hardik Pandya (VC), Shardul Thakur, R Jadeja, Axar Patel, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Jaydev Unadkat, Mohd. Siraj, Umran Malik, Mukesh… pic.twitter.com/PGRexBAGFZ
— BCCI (@BCCI) June 23, 2023