Ind vs SL, Test Series: घरच्या मैदानावर भारतानं सलग पंधरावी कसोटी मालिका जिंकली
IND Vs SL: श्रीलंकाविरुद्ध एम चिन्नास्वामी स्डेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं 238 धावांनी विजय मिळवलाय.
![Ind vs SL, Test Series: घरच्या मैदानावर भारतानं सलग पंधरावी कसोटी मालिका जिंकली Ind vs SL: 15th consecutive Test series win for India at home, know details Ind vs SL, Test Series: घरच्या मैदानावर भारतानं सलग पंधरावी कसोटी मालिका जिंकली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/29/7ae5c782d281f1e2c698cd9c6ec036dd_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND Vs SL: श्रीलंकाविरुद्ध एम चिन्नास्वामी स्डेडियमवर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं 238 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं घरच्या मैदानावर सलग पंधरावी कसोटी मालिका जिंकलीय. 2012-13 साली भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत भारतानं अखेरची मालिका गमावली होती. त्यानंतर भारतानं मायदेशात सलग 15 कसोटी मालिका जिंकली आहे. तर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिली कसोटी मालिकेवर विजय नोंदवलाय.
भारताने श्रीलंकेचा 2-0 असा पराभव करत घरच्या मैदानावर सलग 15व्या मालिका विजयाची नोंद केलीय. भारतानं 2022 पासून मायदेशात खेळल्या गेलेल्या एकाही कसोटी मालिकेत पराभव स्वीकारला नाही. इंग्लंडनं शेवटच्या वेळी भारताचा पराभव केला. मात्र, तेव्हापासून भारताचा विजय सुरूच आहे. इतर कोणत्याही संघाला अशी कामगिरी बजावता आली नाही. या यादीत ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियानं नावावर सलग 10 कसोटी मालिका जिंकण्याची नोंद आहे. ऑस्ट्रेलियानं दोनदा सलग 10 कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे. परंतु, त्यांना 11 व्या सामन्यात त्यांचा पराभव झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव 252 धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेचा संघ 109 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतानं दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला आणखी 419 धावांची गरज होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची दुसऱ्या दिवसाखेर 1 बाद 28 अशी स्थिती होती. त्यानंतर विजयासाठी 419 धावांची गरज असताना श्रीलंकेचा संघ तिसऱ्या दिवशी मैदानात उतरला. परंतु, भारतीय गोलंदाजाच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. अॅंजिलो मॅथ्यूजनं श्रीलंकेच्या संघाकडून सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. त्याच्या व्यतिरिक्त श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अखेर श्रीलंकेच्या संघ 208 धावांवर गुंडाळला.
हे देखील वाचा-
- Cristiano Ronaldo: ऐतिहासिक कामगिरी! ख्रिस्तियानो रोनाल्डोनं जोसेफ बिकानचा विक्रम मोडला, बनला सर्वाधिक गोल करणारा खेळाडू
- IND vs SL 2nd Test Live: दुसऱ्या कसोटीवर भारताची मजबूत पकड, सामन्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
- IND vs SL : रोहित शर्माच्या षटकाराने प्रेक्षकाचं नाक फुटलं; हाड फ्रॅक्चर, टाकेही घातले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)