Cristiano Ronaldo: ऐतिहासिक कामगिरी! ख्रिस्तियानो रोनाल्डोनं जोसेफ बिकानचा विक्रम मोडला, बनला सर्वाधिक गोल करणारा खेळाडू
Cristiano Ronaldo: ख्रिस्तियानो रोनाल्डोनं साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात टॉटनहॅमवर 3-2 अशी सरशी साधली आहे.
![Cristiano Ronaldo: ऐतिहासिक कामगिरी! ख्रिस्तियानो रोनाल्डोनं जोसेफ बिकानचा विक्रम मोडला, बनला सर्वाधिक गोल करणारा खेळाडू Premier League: Cristiano Ronaldo Sets All-time Scoring Record With Hat-trick Against Tottenham In Big Win For Manchester United Cristiano Ronaldo: ऐतिहासिक कामगिरी! ख्रिस्तियानो रोनाल्डोनं जोसेफ बिकानचा विक्रम मोडला, बनला सर्वाधिक गोल करणारा खेळाडू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/15/a25d850d0f7a68e08112c424356464a9_8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Cristiano Ronaldo: मँचेस्टर युनायटेडनं (Manchester United) प्रीमियर लीगमध्ये (Premier League)टॉटनहॅमविरुद्ध (Tottenham) सामन्यात पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) इतिहास रचलाय. या सामन्यात हॅट्रिक गोल करून ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू बनलाय. रोनाल्डोच्या खात्यावर तब्बल 807 गोल जमा आहेत. या कामगिरीसह त्यानं महान फुटबॉलपटू जोसेफ बिकान (Josef Bican) यांचा सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडीत काढलाय. जोसेफ बिकान यांच्या नावावर 805 गोलची नोंद आहे.
ख्रिस्तियानो रोनाल्डोने साकारलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात टॉटनहॅमवर 3-2 अशी सरशी साधली आहे. या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनं विश्वविक्रमाला गवसणी घातलीय. पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना ख्रिस्तियानो रोनाल्डोनं विक्रमी 115 गोल मारले आहेत. तसेच त्यानं स्पोर्टिग संघाकडून पाच, रेयाल माद्रिदकडून 450, युव्हेंटसकडून 101 आणि मँचेस्टर युनायटेडकडून आतापर्यंत 136 गोल केले आहेत.
रोनाल्डोची क्लब कारकिर्दीतील ही 49वी हॅट्रिक
दरम्यान, रोनाल्डोची क्लब कारकिर्दीतील ही 49वी हॅट्रिक होती. प्रीमियर लीगच्या इतिहासात हॅट्रिक करणारा रोनाल्डो हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरलाय. जेथे टेडी शेरिंगहॅमने ऑगस्ट 2003 मध्ये वयाच्या 37 वर्षे आणि 146 दिवसांत हॅट्रिक केली होती. रोनाल्डोने गेल्या वर्षी जानेवारीत पेलेंचा विक्रम मोडित काढला होता. त्यावेळी पेलेंच्या अधिकृत खात्यावर 757गोलची नोंद होती. ख्रिस्तियानो रोनाल्डो याचे जगभरात चाहते आहे. त्यानं प्रीमिअर लीगमध्ये केलेल्या कामगिरीमुळं त्याच्यावर कौतूकाचा वर्ष केला जातोय
हे देखील वाचा-
- IND vs SL : रोहित शर्माच्या षटकाराने प्रेक्षकाचं नाक फुटलं; हाड फ्रॅक्चर, टाकेही घातले
- Virat Kohli : कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते मैदानात, पुढे विराटने जे केले ते तुम्हीच पाहा
- IND vs SL Test : श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी, अर्धशतक ठोकत नवा रेकॉर्ड केला नावावर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)