IND vs SA, 1st Innings Highlights : कार्तिक-पांड्याने सावरला भारताचा डाव; दक्षिण आफ्रिकेसमोर 170 धावांचे आव्हान
IND vs SA, 4th T20, Saurashtra Cricket Association Stadium: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी20 सामन्यात खराब सुरुवात झाल्यानंतरही भारताने एक आव्हानात्मक लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले आहे.
IND vs SA 4th T20 Live : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात चौथा टी20 सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (saurashtra cricket association stadium) खेळवला जात आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात खराब झाली सुरुवातीचे चार गडी खास कामगिरी करु शकले नाही. पण अष्टपैलू हार्दिक आणि अनुभवी दिनेश कार्तिकने (Hardik Pandya and Dinesh Karthik) दमदार खेळी करत संघाचा डाव सावरला आणि धावसंख्या 169 पर्यंत पोहोचवत 170 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले आहे.
आजही दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. आजच्या मैदानाची खेळपट्टी फलंदाजासाठी चांगली असली तरी आतापर्यंत बहुतांश सामन्यात मोठी धावसंख्याही चेस करता आल्याने आजच्या सामन्यातही द.आफ्रिकेने हाच विचार करुन प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असावा. त्यांनी गोलंदाजीही चांगली केली. ऋतुराज, अय्यर, पंत स्वस्तात बाद झाले. ईशानही 27 धावाच करु शकला. पण हार्दिकने 31 चेंडूत 46 धावा ठोकल्या तर दिनेशने कारकिर्दीतील पहिलं टी20 अर्धशतक झळकावत 27 चेंडूत 55 धावा केल्या. अक्षरने चौकार ठोकत डाव संपवला. आता विजयासाठी द. आफ्रिकेला 170 धावा करायच्या आहेत. द. आफ्रिकेकडून इंगिडीने 2 तर मार्को, प्रिटोरियस, महाराज आणि नॉर्खिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
दिनेशचं टी20 मधील पहिलं-वहिलं अर्धशतक
भारताचा एक सर्वात अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिकने आज मोक्याच्या क्षणी 27 चेंडूत 55 धावांची खेळी केली. दिनेश कार्तिकचं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील हे पहिलेच अर्धशतक होय. तब्बल 16 वर्षांपासून दिनेश कार्तिक टी 20 क्रिकेट खेळत आहे. पण त्याला अर्धशतक अद्याप झळकावता आले नव्हते. आज कार्तिकने विस्फोटक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. कार्तिकने या खेळीदरम्यान दोन षटकार आणि नऊ चौकार लगावले. भारताने 16 वर्षापूर्वी एक डिसेंबर 2006 मध्ये पहिला टी 20 सामना खेलला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारतीय संघाने जवळपास 160 पेक्षा जास्त टी 20 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, पहिला टी 20 सामना खेळणारा कार्तिक आताही भारतीय संघाचा सदस्य आहे. इतर सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत.
हे देखील वाचा-
- IND vs SA, 3rd T20: तिसऱ्या टी-20 मध्ये विश्वविक्रमासाठी मैदानात उतरणार भुवनेश्वर कुमार, एक विकेट घेऊन रचणार इतिहास
- Asian Cup 2023: सलग दुसऱ्यांदा भारतीय फुटबॉल संघ एएफसी आशियाई चषक स्पर्धेसाठी पात्र
- IND vs SA 3rd T20: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज काटे की टक्कर, पाच खेळाडूंच्या प्रदर्शनावर सर्वांचं लक्ष!