IND vs SA, 3rd T20: तिसऱ्या टी-20 मध्ये विश्वविक्रमासाठी मैदानात उतरणार भुवनेश्वर कुमार, एक विकेट घेऊन रचणार इतिहास
IND vs SA, 3rd T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना (India vs South Africa) विशाखापट्टम येथे खेळला जाणार आहे.
IND vs SA, 3rd T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना (India vs South Africa) विशाखापट्टम येथे खेळला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन टी-20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. यामुळं या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आव्हान टिकवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. याशिवाय भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांच्याकडं विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची संधी उपलब्ध झाली आहे. टी-20 क्रिकेटच्या पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यापासून भुवनेश्वर कुमार एक विकेट्स दूर आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी-20 सामना खेळला जात आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात चाहत्यांच्या नजरा भुवनेश्वर कुमार असणार आहेत. या सामन्यात भुवनेश्वरने एक विकेट घेतल्यास तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल. सध्या भुवी वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री आणि किवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीसह संयुक्त पहिल्या स्थानावर आहे.
पावर प्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
क्रमांक | गोलंदाज | विकेट्स |
1 | सॅम्युअल बद्री | 33 |
2 | भुवनेश्वर कुमार | 33 |
3 | टीम साऊथी | 33 |
4 | शकिब अल हसन | 27 |
5 | जोश हेझलवूड | 30 |
भुवनेश्वर कुमारची आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी
भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी-20 मध्ये भुवनेश्वर कुमारनं भेदक गोलंदाजी केली होती. भुवनेश्वर कुमारनं चार षटकात 13 धावा देऊन चार विकेट्स घेतल्या. मात्र, हेन्रिक क्लासेनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतावर चार विकेट्सनं विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमारनं एकूण 267 विकेट्स (कसोटी 63, एकदिवसीय क्रिकेट- 141 आणि टी-20 क्रिकेट-67) घेतल्या आहेत.
हे देखील वाचा-