Palak Muchhal Reaction On Smriti Palash Wedding: स्मृती मानधना-पलाशच्या लग्नाबाबत बहिणीचं सूचक वक्तव्य, 'त्या' दोन वाक्यांनी आशा पल्लवित, पलक मुच्छल नेमकं काय म्हणाली?
Palak Muchhal Reaction On Smriti Mandhana Palash Muchhal Wedding: पलाशनं स्मृतीची फसवणूक केल्याचं बोललं जाऊ लागलं. तेव्हापासून पलाश मुच्छल आणि स्मृतीच्या लग्नाबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Palak Muchhal Reaction On Smriti Mandhana Palash Muchhal Wedding: टीम इंडियाची (Team India) स्टार क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल (Music composer Palash Muchhal) यांचं लग्न अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समोर आलं. पण, त्यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छलचे (Palash Muchhal)) फ्लर्टी चॅट्स व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. पलाशनं स्मृतीची फसवणूक केल्याचं बोललं जाऊ लागलं. तेव्हापासून पलाश मुच्छल आणि स्मृतीच्या लग्नाबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण, अजूनही दोन्ही कुटुंबीयांकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नव्हतं. अशातच आता पलाश मुच्छलची बहीण, सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छलनं दोघांचं लग्न पुढे ढकलण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पलक मुच्छलनं, पलाश आणि स्मृतीचं लग्न पुढे ढकलण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. मुलाखतीदरम्यान पलक म्हणाली की, "मला वाटतं की, दोन्ही कुटुंबांनी खूप कठीण काळाचा सामना केला आहे आणि मी आताच म्हटल्याप्रमाणे, मी पुन्हा सांगू इच्छिते की, आपण या काळात पॉझिटीव्ह गोष्टींचा विचार करूया, शक्य तितकी पॉझिटीव्हीटी पसरवूया आणि स्ट्राँग राहूया.'
स्मृती, पलाशचं लग्न पुढे ढकल्यानंतर काय म्हणालेली पलक मुच्छल?
यापूर्वी, पलक मुच्छलनं पलाश आणि स्मृतीचं लग्न पुढे ढकलण्याचं कारण उघड केलं होतं. तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत सर्वांना दोन्ही कुटुंबांच्या प्रायव्हसीचा आदर करण्याचं आवाहन केलं होतं. पोस्ट शेअर करत पलकनं लिहिलेलं की, "स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे, स्मृती आणि पलाशचं लग्न पुढे ढकलण्यात आलंय... मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, या कठीण काळात कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करा..."
पलाश मुच्छल स्मृती मानधनाला चिट करत होता? (Smriti Mandhana And Palash Muchhal Wedding)
पलाश मुच्छलच्या चॅटचे स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आधीच्या डेटिंगच्या अफवा आणि रिलेशनशिप्सबाबतही चर्चांना उधाण आलं आहे. स्मृतीसोबतच्या रिलेशनशिपच्या आधी आणि नंतरही पलाशचं नाव अनेक मुलींसोबत जोडलं गेल्याचं सांगितलं जात आहे. एवढंच काय तर, त्यानं त्या मुलींनाही सेम टू सेम स्मृतीसारखंच गुडघ्यावर बसून अंगठी देऊन प्रपोज केल्याचं बोललं जात आहे. पलाशनं आतापर्यंत किती मुलींना डेट केलंय? याचा कच्चाचिठ्ठाच नेटकऱ्यांनी बाहेर काढलाय. हे सर्व पाहून अनेकांना धक्का बसलाय. तसेच, आता या सर्व प्रकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. अनेकांनी पलाशची बाजू घेतलीय, तर अनेकांनी स्मृती मानधनाला सहानुभूती देऊन पलाशपासून दूर राहण्याचाच सल्ला दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























