एक्स्प्लोर

IND Vs SA : कटकमध्ये भारतीय संघात बदलाची शक्यता, अशी असू शकते Playing 11

IND Vs SA 2nd T20 Playing 11 : कटक येथे आज होणाऱ्या टी 20 सामन्यात भारतीय गोलंदाजीमध्ये बदलाची शक्यता आहे. अर्शदीप सिंह अथवा उमरान मलिक यांना भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. 

IND Vs SA 2nd T20 Playing 11 : दक्षिण अफ्रिकाने पहिल्या टी 20 सामन्यात भारताचा सात गड्यांनी पराभव केला. दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने तब्बल 200 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग केला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. गोलंदाजांनी खराब कामगिरी केली.  हे पाहता दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. कटक येथे होणाऱ्या टी 20 सामन्यात भारतीय गोलंदाजीमध्ये बदलाची शक्यता आहे. अर्शदीप सिंह अथवा उमरान मलिक यांना भारतीय संघात पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. 

पहिल्या टी 20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी हर्षल पटेल याची गोलंदाजी फोडून काढली. हर्षल पटेलच्या एका षटकात आफ्रिकाने 22 धावा वसूल केल्या होत्या. त्यामुळे हर्षल पटेलच्या जागी अर्शदीप सिंह अथवा उमरान मलिक यापैकी एकाला संधी मिळू शकते. अक्षर पटेल याच्या गोलंदाजीवरही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे अक्षर पटेलच्या जागी युवा रवी बिश्नोईला संधी मिळण्याची शक्यता आहे. डेथ ओव्हरमध्ये भारतीय गोलंदाजी कमकुवत जाणवत होती, अखेरच्या आठ षटकात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी तब्बल 110 धावा वसूल केल्या होत्या. त्यामुळो गोलंदाजीत बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान यांची प्लेईंग 11 मधील जागा निश्चित मानली जात आहे. पॉवरप्लेच्या षटकात भुवनेश्वर कुमारने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. तर पहिल्या षटकात महागडा ठरणाऱ्या आवेश खान याने अखेरच्या तीन षटकात टिचून मारा केला होता. अर्शदीप डेप्थ ओव्हरमध्ये चांगला पर्याय मानला जाऊ शकतो.  

फलंदाजीत बदलाची शक्यता नाही - 
पहिल्या टी 20 सामन्यात फलंदाजांनी आपलू भूमिका चोख बजावली होती. ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी दमदार सलामी दिली होती. त्यानंतर श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनीही प्रभावी फलंदाजी केली होती. त्यामुळे फलंदाजीत बदल होण्याची शक्यता कमीच आहे.  

कटक येथे होणाऱ्या टी 20 सामन्यातील संभावित प्लेईंग 11 - (India Playing 11 for 2nd T20): ईशान किशन, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंह/उमरान मलिक, रवि बिश्नोई.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
Embed widget