IND vs SA 1st T20: दक्षिण आफ्रिका पलटवार करणार की सूर्यकुमार यादव विजयाचा ट्रेंड कायम ठेवणार? पहिला टी 20 सामना कुठं मोफत पाहणार?
India vs South Africa 1st T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिली मॅच दरबानमध्ये होणार आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.
India vs South Africa 1st T20 दरबान : भारत आणि दक्षिणआफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी 20 मालिका उद्यापासून सुरु होणार आहे. पहिली मॅच उद्या दरबानमध्ये होणार आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्त्वात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला आहे. भारतानं टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. त्यानंतर दोन्ही संघ टी 20 मालिकेच्या निमित्तानं पुन्हा आमने सामने येत आहेत.
भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करतोय. तर, अभिषेक वर्मा, तिलक वर्मा, रिंकु सिंगला भारतीय संघात स्थान मिळेल. दोन्ही संघांमध्ये चार सामन्यांची मालिका होणार आहे. 8 नोव्हेंबर,10 नोव्हेंबर, 13 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर रोजी चार सामने पार पडणार आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका मोफत सामने कुठं पाहणार?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिकेचं प्रक्षेपण टीव्ही आणि मोबाईलवर पाहता येईल. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील मॅच भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या सायंकाळी 8.30 वाजता सुरु होईल. स्थानिक प्रमाणवेळेनुसार मॅच सायंकाळी 5 वाजता सुरु होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची मालिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतील लढतीत दोन्ही संघ आमने सामने आले होते. भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरु शकते.
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 सामने मोफत पाहण्यासाठी मोबाईल फोनमध्ये जिओ सिनेमाचं एप डाऊनलोड करावं लागेल. याशिवाय जिओ सिनेमाच्या वेबसाईटवर देखील मॅच पाहता येईल. या ठिकाणी मोफत सामने पाहता येतील. स्पोर्ट्स 18 वर त्याचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल.
भारतीय संघात कुणाला संधी ?
टीम इंडियामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंसह नव्या खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे. हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, संजू सॅमसन आणि अर्शदीप सिंग ला टीममध्ये स्थान मिळालं आहे. याशिवाय आवेश खान, रवि बिश्नोई, विजयकुमार, रमनदीप सिंह, अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंगला संधी देण्यात आली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ
भारत - सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार, अवेश खान, यश दयाल ,रिंकू सिंग
दक्षिण आफ्रिका- एडिन मार्करम (कप्तान), रीजा हेंड्रिक्स, डेविड मिलर, मार्को जानेसन, पॅट्रिक क्रूगर, डोनोवन फरेरा, हेनरिक क्लासेन, रयान रिकेलटन, ओटनील बार्टमैन, गेराल्ड कोएट्जी, केशव महाराज, मिहलाली मपोंगवाना, नकाबायोमजी पीटर
इतर बातम्या :
भारत की ऑस्ट्रेलिया...बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कोण जिंकणार?, रिकी पॉन्टिंगची धक्कादायक भविष्यवाणी