T20 World Cup 2024 : फक्त 342 रुपयात खरेदी करा हायव्होल्टेज IND vs PAK सामन्याचे तिकीट; या दिवशी रंगणार 'महामुकाबला'चा थरार
यंदाच्या आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार संयुक्त अरब अमिरातीमध्ये रंगणार आहे.
IND vs PAK Match Ticket Price Women’s T20 World Cup 2024 : यंदाच्या आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार संयुक्त अरब अमिरातीमध्ये रंगणार आहे. ही स्पर्धा ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुबईला पोहोचला आहे. त्याचवेळी, आयसीसीने महिला टी-20 वर्ल्ड कपसाठी सामन्यांच्या तिकिटांच्या किंमती जाहीर केल्या आहेत आणि ऑनलाइन बुकिंग देखील सुरू केले आहे, परंतु भारत आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यातील महान सामन्याच्या तिकिटांच्या किमती जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल....
महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ 6 ऑक्टोबरला आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता भिडतील. त्याचवेळी याच मैदानावर संध्याकाळी वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड यांच्यात सामना होणार आहे. अशा परिस्थितीत आयसीसीने दोन्ही सामन्यांचे एक तिकीट जारी केले आहे.
सर्वात कमी किमतीचे तिकीट फक्त 15 दिरहम आहे, भारतीय रुपयात ही किंमत अंदाजे 342 रुपये आहे. तथापि, वेगवेगळ्या स्टँडच्या तिकिटांच्या किमती देखील भिन्न आहेत, जे 25 दिरहम म्हणजे अंदाजे 570 भारतीय रुपये आहेत. तुम्ही t20worldcup.platinumlist.net या वेबसाइटवर ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. 18 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी तिकिटाची गरज नाही.
महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. या 10 संघांची प्रत्येकी 5 च्या दोन वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अ गटात ठेवण्यात आले आहे. या संघात भारताशिवाय न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आहेत.
या फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान 15 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाने 12 सामने जिंकले आहेत, तर 3 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. टी-20 वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला.
हे ही वाचा -