एक्स्प्लोर
SIP : 5000 रुपयांची दरमहा एसआयपी की 60000 रुपयांची लमसम, कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर, तज्त्र काय म्हणतात जाणून घ्या?
SIP : एसआयपीद्वारे गुंतवणूक सुरु करताना अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो. छोट्या रकमेच्या गुंतवणुकीनं सुरुवात करावी की मोठी रक्कम एकदाच लमसम म्हणून गुंतवावी.
एसआयपी
1/6

भारतात अलीकडे एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचा प्रकार लोकप्रिय ठरतो आहे. मात्र, अनेकांच्या नात छोट्या रकमेनं दर महिन्यात गुंतवणूक करावी की वर्षाच्या सुरुवातीला मोठी रक्कम लमसम म्हणून गुंतवावी असा प्रश्न असतो.
2/6

समजा तुम्ही 5000 रुपयांची दरमहा एसआयपी 10 वर्ष सुरु ठेवली तर 12 टक्क्यांच्या रिटर्नची अपेक्षा ठेवल्या फंड 11.61 लाख रुपये असेल. तर, दरवर्षी 60 हजार रुपयांची लमसम गुंतवणूक केल्यास तुमच्या फंडात 12.30 लाख रुपयांची रक्कम असेल. म्हणजेच लमसममध्ये 69 हजार रुपये अधिक मिळतील.
3/6

मान्यताप्राप्त वित्तीय नियोजक किंवा सल्लागार रितेश सभरवाल यांच्या मते लमसमसाठी वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणूकदाराकडे 60000 रुपये असणं आवश्यक आहे. अधिक पगारदार लोक असं करु शकत नाहीत. त्यामुळं पगारदारांसाठी दरमहा 5000-5000 च्या एसआयपीचा पर्याय फायदेशीर आहे.
4/6

60 हजारांच्या लमसम गुंतवणुकीसाठी अनेक महिने रक्कम बचत खात्यात ठेवावी लागते. तिथं रिटर्न कमी मिळतात. काही अत्यावश्यक खर्च आल्यास म्हणजे वैद्यकीय कारण, सण, यात्रा, घरातील वस्तूंची खरेदी यासाठी पैसे खर्च झाल्यास गुंतवणुकीची रक्कम खर्च होऊ शकते. त्याच्या तुलनेत एसआयपीचा फॉर्म्युला फायदेशीर आहे. प्रत्येक महिन्यात विचारपूर्वक गुंतवणूक सुरु राहते.
5/6

बाजारात अस्थिरता असते तेव्हा देखील एसआयपी सुरु असणं फायदेशीर ठरतं. मार्केट पडलेलं असतं तेव्हा 5000 रुपांमध्ये अधिक यूनिट खरेदी करता येतात. एसआयपी आणि लमसम गुंतवणुकीचे निश्चित फायदे आहेत. मात्र, नियमित गुंतवणूक सुरु ठेवणं गरजेचं आहे.
6/6

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 21 Nov 2025 11:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























