(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind vs Pak T20 World Cup 2024 : अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटीलचा धमाका! पाकिस्तानने भारताला दिले 106 धावांचे लक्ष्य
महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 चा सातवा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जात आहे.
India vs Pakistan T20 World Cup 2024 : महिला टी-20 वर्ल्ड कप 2024 चा सातवा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने भारताला 106 धावांचे लक्ष्य दिले आहे.
दुबईत खेळल्या जात असलेल्या सामन्यात टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील यांचा धमाका पाहिला मिळाला, पाकिस्तानकडून निदा दारने सर्वाधिक 28 धावा केल्या आहेत. तिने 34 चेंडूंचा सामना करताना एक चौकार मारला आहे.
पाकिस्तानची सुरुवात खराब झाली आणि त्यानंतर संघाला सावरता आले नाही. पहिली विकेट गुल फिरोझाच्या रूपाने पडली. ती शून्यावर बाद झाली. रेणुका सिंगने तिला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर सिद्रा अमीन 8 धावा करून बाद झाली. सलामीवीर मुनिबा अलीने 17 धावांचे योगदान दिले. 26 चेंडूंचा सामना करताना तिने 2 चौकारही मारले. सोहेल अवघ्या 3 धावा करून बाद झाली. आलिया रियाझने 4 धावा केल्यानंतर तिची विकेट गमावली.
पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाही काही विशेष करू शकली नाही. फक्त 8 चेंडूत 13 धावा करून ती बाद झाली. तुबा हसनला खातेही उघडता आले नाही. पाकिस्तानविरुद्ध भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. अरुंधतीने 4 षटकात 19 धावा देत 3 बळी घेतले. तर श्रेयंकाने 4 षटकात फक्त 12 धावा देत 2 बळी घेतले. तिने एक मेडन ओव्हरही टाकली. रेणुका सिंगने 4 षटकात 23 धावा देत 1 बळी घेतला. दीप्ती शर्माने 4 षटकात 24 धावा देत 1 बळी घेतला.
हे ही वाचा -
IPL 2025 : हार्दिक पांड्यासाठी मित्रच ठरला 'व्हिलन'? मुंबईच्या कर्णधारपदाबाबत केलं मोठं वक्तव्य