IND vs PAK : भारतीय महिला पाकिस्तानविरुद्ध करणार वर्ल्डकपचा शुभारंभ, कधी, कुठे पाहाल सामना?
IND vs PAK : महिला विश्वचषक स्पर्धेला 4 मार्चपासून सुरुवात झाली आहे. यात भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध असणार आहे.
IND vs PAK : जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी संघ म्हणजे भारत-पाकिस्तान (India vs Pakistan). या दोन्ही संघाचा सामना त्यांच्या देशवासियांसाठीच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगतासाठी पर्वणी असतो. दरम्यान भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा मैदानावर आमने-सामने येणार असून यावेळी दोन्ही देशांच्या महिला एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. सध्या सुरु असलेल्या महिला विश्वचषक 2022 (Womens world cup 2022) स्पर्धेत भारत पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला विश्वचषक 2022 स्पर्धेला 4 मार्चपासून सुरुवात झाली आहे. आता भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश स्पर्धेची सुरुवात एकमेकांविरुद्ध पहिला सामना खेळत करणार आहेत. दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असून अनेकांनी या सामन्याबाबत ट्वीट केलं आहे. पुरुष संघाचा माजी कर्णधार विराटनेही महिला संघाला चिअर करण्यासाठी ट्वीट केलं होतं.
कुठे खेळवला जाणार सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान महिला संघातील हा सामना न्यूझीलंडच्या बे ओव्हल मैदानात खेळवला जाणार आहे.
कधी खेळवला जाणार सामना?
भारत आणि पाकिस्तान महिला संघातील हा सामना उद्या अर्थात 6 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 मार्च रोजी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.
कसा पाहाल सामना?
हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या चॅनेलवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टार या अॅपवरही हा सामना पाहता येईल.
भारतीय संघ:
मिथाली राज (कर्णधार), तानिया भाटीया (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, मेघना सिंह, पुजा वस्त्रकर, रेणुका सिंह, शेफाली वर्मा, रिचा घोष, यस्तीका भाटीया.
हे ही वाचा -
- IND vs SL, 1st Test: रविंद्र जडेजानं रचला इतिहास, कपिल देवचा 'हा' विक्रम मोडला
- Virat Kohli Test Runs : शंभराव्या कसोटीत 8000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली दुसरा फलंदाज
- 'अनुष्का ग्राऊंडवर काय करतेय?' विराट कोहलीच्या 100व्या कसोटी सामन्या दरम्यान नेटकऱ्यांकडून ट्रोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha