एक्स्प्लोर

IND vs SL, 1st Test: रविंद्र जडेजानं रचला इतिहास, कपिल देवचा 'हा' विक्रम मोडला

रविंद्र जडेजाने 175 धावांची दमदार खेळी केली आहे. या खेळीच्या बळावर भारताने आपला पहिला डाव 574 धावांवर घोषीत केला आहे. या सामन्यात जडेजाच्या नावावर एक नवा विक्रम झाला आहे.

IND vs SL, 1st Test, Mohali : मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. हा दुसरा दिवस गाजवला तो भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने. रविंद्र जडेजाने 175 धावांची दमदार खेळी केली. या खेळीच्या बळावर भारताने आपला पहिला डाव 574 धावांवर घोषीत केला आहे. दरम्यान, या सामन्यात रविंद्र जडेजाच्या नावावर एक नवा विक्रम झाला आहे. त्याने जडेजाने भारताचा माजी खेळाडू कपिल देवचा विक्रम मोडला आहे.

रविंद्र जडेजा हा सातव्या क्रमांकावर खेळायला आला होता. यापूर्वी सातव्या क्रमांकावर खेळायला  येऊस सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा कपिल देवच्या नाववर होता. कपिल देवने सातव्या क्रमांकावर खेळायला येऊन 170 धावांची खेळी केली होती. पण आज रविंद्र जडेजाने 175 धावंची दमदार खेळी करत कपिल देवचा विक्रम मोडला आहे. या सामन्यात रविंद्र जडेदाच्या नावावर एका नवीन विक्रमाची नोंद झाली आहे. 
  
दरम्यान, दुसऱ्य दिवशी भारताने दमदार कामगिरी करत आपला पहिला डाव 574 धावांवर घोषीत केला. यामध्ये रविंद्र जडेजाने दमदार खेळी केली आहे. जडेजा 175 धावांवर नाबाद राहिला आहे. तर मोहम्मद शमी 20 धावांवर नाबाद राहिला आहे. 8 विकेटच्या मोबदल्यात भारताने श्रीलंकपुढे 574 धावंचा डोंगर उभा केला आहे.
 
रविंद्र जडेजच्या दिडशतकी खेळीच्या बळावर भारताने लंकेसमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. 8 गड्यांच्या मोबदल्यात भारताने लंकेसमोर 574 धावांचे आव्हान उभे केले आहे. 574 धावांवर कर्णधार रोहित शर्माने आपला पहिला डाव घोषीत केला आहे. त्यमुळे  आता भारत मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजाची निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 85 षटकांत 6 बाद 357 धावा केल्या. पहिल्या दिवशी ऋषभ पंतने 97 चेंडूमध्ये 96 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 128 चेंडूत 58 धावा केल्या. विराट कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना आहे. मात्र कोहली 45 धावा करुन तंबूत परतला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा पहिला विजय, शुभमन गिलची दमदार कामगिरी, अक्षर-वॉशिंग्टन ठरले विजयाचे शिल्पकार, वनडे मालिकेत आघाडी
इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचा पहिला विजय,शुभमन गिल, अक्षर-वॉशिंग्टन ठरले विजयाचे शिल्पकार, वनडे मालिकेत आघाडी
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Ind vs Eng 1st ODI : इंग्लंडने जिंकली नाणेफेक, शुभमन गिलचा पहिल्याच सामन्यात धडाकेबाज निर्णय, भारताची खतरनाक Playing XI
इंग्लंडने जिंकली नाणेफेक, शुभमन गिलचा पहिल्याच सामन्यात धडाकेबाज निर्णय, भारताची खतरनाक Playing XI

व्हिडीओ

Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget