'अनुष्का ग्राऊंडवर काय करतेय?' विराट कोहलीच्या 100व्या कसोटी सामन्या दरम्यान नेटकऱ्यांकडून ट्रोल
Virat Kohli : विराट कोहली आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. यावेळी बीसीसीआयने सामन्यापूर्वी विराटचा गौरव करण्यात आला.
Virat Kohli and Anushka Sharma : भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. या खास प्रसंगी बीसीसीआयने सामन्यापूर्वी विराटचा सन्मान केला. हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. यामध्ये भारतीय संघाचे खेळाडूही उपस्थित होते. मात्र, या खेळाडूंबरोबर अनुष्का शर्माही उपस्थित होती आणि हाच आज सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. काही लोक अनुष्काच्या मैदानावर उपस्थित राहण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तर, काहीजण सहमती दाखवत आहेत. सोशल मीडियावर नेमक्या काय चर्चा होतायत ते जाणून घेऊयात.
अनेक लोकांचा आक्षेप :
ग्राऊंडवर विराटच्या बाजूला अनुष्का शर्मा उभी का? यावर नेटकऱ्यांचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'अनुष्का ग्राऊंडवर काय करतेय? नियमांनुसार तिला ग्राऊंडवर उभं राहण्याची परवानगी आहे का? तर, एका यूजरने विचारले की, 'कोणी सांगेल का की अनुष्का मैदानात का आली आहे?' दुसर्या यूजरने म्हटले की, 'ती अनुष्का शर्मा असल्यामुळे मैदानात आहे.' अशा अनेक प्रकारच्या कमेंंट्स आणि पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Can anyone please explain me what was Anushka Sharma doing on ground?????????????Iske pehle kabhi kisi player ne 100 match nai kheli hai????????? Tab unki biwi aise unke sath ground par aayi thi????????????
— De-wang (@RetardedHurt) March 4, 2022
Congratulations Kohli Saab @imVkohli pic.twitter.com/VxVrKWdfaq
— saanath ॐ (@sdbgrx) March 4, 2022
समर्थन करणारे लोक म्हणतात...
सोशल मीडियावर अनेकांनी अनुष्काच्या उपस्थितीचे समर्थन केले आहे. यूजर्सने म्हटले आहे की, 'खेळाडूचे कुटुंब मैदानावर येऊ शकत नाही, असा कोणताही नियम नाही'. सामन्यादरम्यान बाहेरचा कोणीही येऊ शकत नाही, पण सामन्यापूर्वी एखादा मोठा कार्यक्रम असेल आणि कारकिर्दीचा खास क्षण असेल तर त्यामध्ये पत्नीच्या उपस्थितीस काय हरकत आहे?' या प्रसंगाच्या समर्थनार्थ अनेक लोक वेगवेगळे ट्विट करत आहेत. काहीजण अनुष्काला विराटसाठी लकी असल्याचे सांगत आहेत. तर काहीजण अनुष्काला विराटची लकी फॅन सांगत आहेत.
Couldn't be a better moment than this🥺Playing the 100th Test matches 🇮🇳😘getting felicitated with your Wife standing next to you😘🇮🇳#VK100 #100thTestForKingKohli #ViratKohli #AnushkaSharma #KingKohli pic.twitter.com/oFTmfvxZKF
— Rahul Raj (@ricky_n_rahul) March 4, 2022
Anushka Sharma is the luckiest fan girl of Virat Kohli😒❤️#100thTestForKingKohli #ViratKohli𓃵 pic.twitter.com/FPv4Ohjgfh
— 𝐃𝐎𝐋𝐋𝐘𓃵 (@Nara__Raakshasa) March 4, 2022
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha