IND vs NZ 2nd T20 LIVE : भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ची आघाडी
IND vs NZ 2nd T20 LIVE Updates: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आज माऊंट . दुसरा टी20 सामना खेळणार आहे.
LIVE
Background
IND vs NZ, 2nd T20 Live : टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आधी टी20 आणि नंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दरम्यान भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) टी20 मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन इथे शुक्रवारी (18 नोव्हेंबर) खेळवला जाणार होता. पण पावसाच्या व्यत्ययामुळे सामना होऊ शकला नाही. ज्यानंतर आज माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल मैदानात दुसरा टी20 सामना खेळणार आहे. नुकत्याच झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये भारत सेमीफायनलपर्यंतच धडक मारु शकला. ज्यानंतर आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी20 विश्वचषकातील पराभवानंतर एक नवी सुरुवात करणार आहे,
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत 21 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारतानं 20 पैकी 11 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 9 सामन्यात विजय मिळवता आलाय. याशिवाय, एक सामना पावसामुळं रद्द झालाय.
टी20 मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ?
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
कधी, कुठं रंगणार सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज माउंट मॉन्गनुई क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी 12 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.