एक्स्प्लोर

IND vs NZ, 1st ODI : ब्रेसवेलची कडवी झुंज अपयशी, रंगतदार सामन्यात भारताचा 12 धावांनी विजय

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना अगदी अटीतटीचा झाला 350 धावांचे तगडे लक्ष्यही न्यूझीलंडने जवळपास गाठलेच होते, पण अखेरच्या षटकात शार्दूल ठाकूरनं अप्रतिम विकेट घेत भारताला सामना जिंकवून दिला.

India vs New Zealand ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक अतिशय रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. सर्वात आधी भारताच्या शुभमन गिलने (Shubhman Gill) वादळी द्वीशतक ठोकत भारताची धावसंख्या 349 पर्यंत नेली. त्यानंतर 350 धावांचं तगडं लक्ष्य न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेलनं 140 धावांची तुफान खेळी करत जवळपास गाठलंच होतं. पण अखेरच्या षटकात तो शार्दूल ठाकूरच्या अप्रतिम चेंडूवर पायचीत झाला आणि भारतानं सामना 12 धावांनी जिंकला. 

सामन्याचा विचार केला तर आजही भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीपासून स्फोटक फलंदाजी सुरु करत भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली भागिदारी उभारली. पण 34 धावा करुन रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर त्यानंतर विराटही स्वस्तात तंबूत परतला. ईशानही दुहेरी संख्या गाठू शकला नाही. पण या  एका बाजूने शुभमन मात्र टिकून खेळत होता. त्यानं शतक पूर्ण केलं, तेव्हा सूर्याने 31 तर पांड्याने 28 धावांची साथ शुभमनला दिली. पण दोघेही बाद झाल्यावरही शुभमनने तुफान फलंदाजी करत द्वीशतक  पूर्ण केलं. त्यानं 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकार ठोकत 208 धावा केल्या ज्यामुळे भारताची धावसंख्या 349 पर्यंत पोहोचली.

ब्रेसवेल-सँटनर जोडीची कमाल भागिदारी

न्यूझीलंडचा संघ (New Zealand Team) 350 धावाचं तगडं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरला आणि सुरुवातीपासून त्यांचे फलंदाज बाद होऊ लागले. कॉन्वे (Devon Conway) 10 धावांवर बाद झाल्यावर इतरही फलंदाज स्वस्तात बाद होत होते. फिन अॅलननं 40 धावांची चांगली खेळी केली. पण तो देखील शार्दूल ठाकूरचा शिकार झाला. एकीकडे पटापट विकेट पडत असताना सातव्या विकेटसाठी मायकल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी एक अप्रतिम भागिदारी केली. पण सँटनर 57 धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या बाजूने षटकार चौकार ठोकत ब्रेसवेल लक्ष्याचा पाठलाग करतच होता. पण हार्दिक पांड्याने 49 वी ओव्हर अप्रतिम टाकत एक विकेट घेत केवळ 4 रन दिल्या. ज्यानंतर अखेरच्या षटकात 20 धावा न्यूझीलंडला हव्या होत्या. शार्दूल गोलंदाजीला आला पहिला बॉल सिक्स तर दुसरा वाईड टाकला. त्यानंतर मात्र शार्दूलनं अप्रतिम यॉर्कर टाकत ब्रेसवेललं पायचीत केलं आणि सामना भारताने 12 धावांनी जिंकला.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Embed widget