डबल धमाका... आधी रोहित, मग शुभमन गिलचं शतक, धर्मशालाच्या कडाक्याच्या थंडीत इंग्लंडचा घामटा काढला!
IND vs ENG : गोलंदाजांची आपलं काम चोख बजावल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनीही शानदार कामगिरी केली.
![डबल धमाका... आधी रोहित, मग शुभमन गिलचं शतक, धर्मशालाच्या कडाक्याच्या थंडीत इंग्लंडचा घामटा काढला! IND vs ENG rohit sharma shubman gill century fifth test match dharmshala marathi news डबल धमाका... आधी रोहित, मग शुभमन गिलचं शतक, धर्मशालाच्या कडाक्याच्या थंडीत इंग्लंडचा घामटा काढला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/08/dc64ba98309988868f142c4a425effd01709877898715265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs ENG : गोलंदाजांची आपलं काम चोख बजावल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनीही शानदार कामगिरी केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज शतकं ठोकली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या दोघांच्या शतकी खेळीच्या बळावर भराताने इंग्लंडविरोधात पहिल्या डावात आघाडी घेतली. कुलदीप यादव आणि आर. अश्विन यांनी इंग्लंडला 218 धावांत रोखलं. भारताकडे सध्या 46 धावांची आघाडी आहे. लंचसाठी खेळ थांबला तेव्हा शुभमन गिल 101 तर रोहित शर्मा 102 धावांवर खेळत आहे.
रोहित शर्माचं शतक -
भारताचा कर्णधार रोहित शर्मानं धर्मशाला कसोटी सामन्यात शानदार शतक ठोकले. भारताच्या गोलंदाजांनी आधी इंग्लंडला रोखल्यानंतर फलंदाजांनी चोपले. रोहित शर्मानं इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. रोहित शर्मान 154 चेंडूमध्ये शतक ठोकले. इंग्लंडविरोधात मालिकेतील रोहित शर्माचे दुसरं शतक होय. रोहित शर्मानं इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पहिल्या दिवशी रोहित शर्मा यानं टिच्चून फलंदाजी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात रोहित शर्मानं शतक पूर्ण केले. रोहित शर्मानं 155 चेंडूत शतक पूर्ण केले. यादरम्यान त्यानं 3 षटकार आणि 13 चौकार लगावले.
शुभमन गिल याचाही शतकी तडाखा -
रोहित शर्मानंतर शुभमन गिल यानेही शतक ठोकले. शुभमन गिल यानं 138 चेंडूत शतक ठोकले. शुभमन गिल यानं 5 षटकार आणि 10 चौकारांचा पाऊस पाडला. यशस्वी जायस्वाल बाद झाल्यानंतर शुभमन गिल यानं रोहित शर्माला साथ दिली.
भारताकडे मोठी आघाडी -
इंग्लंडला 218 धावांत रोखल्यानंतर भारताच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा यांनी 104 धावांची सलामी दिली. यशस्वी जायस्वाल यानं 57 धावांचं योगदान दिलं. जायस्वाल बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या डावाला आकार दिला. दोघांनीही शतकी खेळी केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 150 धावांची भागिदारी केली. भारताकडे सध्या 44 धावांची आघाडी आहे.
भारताच्या तीन फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडला धुव्वा उडवला, पहिला दिवस भारताच्या नावावर -
कुलदीप यादव आणि रवीचंद्रन अश्विन या फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 218 धावांत गुंडाळून पाचव्या कसोटी सामन्यावर भारताला वरचष्मा मिळवून दिला . या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारतानं एक बाद 135 धावांची मजल मारली होती. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी रोहित शर्मा 52 आणि शुभमन गिल 26 धावांवर खेळत होता. यशस्वी जैस्वालनं 58 चेंडू्ंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह 57 धावांची खेळी उभारली. त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव दोन बाद 100 धावांवरून अवघ्या 218 धावांत गडगडला. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनं 72 धावांत इंग्लंडचा निम्मा संघ गुंडाळला. अनुभवी रवीचंद्रन अश्विननं 51 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडून त्याला छान साथ दिली. भारताच्या तीन फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडच्या दहा फलंदाजांना तंबूत धाडलं. आता भारतीय संघाने सामन्यात मोठी आघाडी घेण्याच्या दिशेने पावलं टाकली आहेत. सध्या भारताकडे 46 धावांची आघाडी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)