ENG vs IND, 2nd ODI : भारतीय फलंदाजी ढासळली, 100 धावांनी इंग्लंड विजयी, मालिका 1-1 ने बरोबरीत
IND vs ENG, 2nd Innings Highlights : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा संघ अवघ्या 146 धावांवर सर्वबाद झाल्यामुळे 100 धावांनी इंग्लंडचा संघ विजयी झाला आहे.
IND vs ENG, 2nd ODI, The Lords Stadium: भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला एका मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. इंग्लंडने दिलेल्या 247 धावांचा पाठलाग करताना भारत 146 धावावंर सर्वबाद झाल्याने 100 धावांनी पराभूत झाला आहे.
England win the second #ENGvIND ODI. #TeamIndia will look to bounce back in the series decider on Sunday. 👍 👍
— BCCI (@BCCI) July 14, 2022
Scorecard 👉🏻👉🏻 https://t.co/N4iVtxbNBF pic.twitter.com/9pjXrRktJH
क्रिकेटची पंढरी म्हणून प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानात पार पडलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर ज्यानंतर इंग्लंडची सुरुवात काहीशी चांगली झाली, बेअरस्टो (38) आणि रॉय (28) जोडीने अर्धशतकी भागिदारी केली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी एक-एक करत इंग्लंडला झटके देण्यास सुरुवात केली. पण अखेरच्या काही षटकांमध्ये मोईन अली आणि डेविड विली यांनी एक उत्तम भागिदारी रचत इंग्लंडचा डाव सावरला. यावेळी अलीने 47 तर विलीने 41 धावा केल्या. भारताकडून चहलने अप्रतिम गोलंदाजी करत 10 ओव्हरमध्ये 47 धावा देत महत्त्वाच्या 4 विकेट्स घेतल्या. पांड्या-बुमराह यांनीही प्रत्येकी दोन तर शमीने आणि प्रसिध कृष्णाने एक-एक विकेट घेतली.
भारतीय फलंदाजी ढासळली
247 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताला सुरुवातीपासून खास कामगिरी करता आली नाही. भारताते आघाडीचे फलंदाज अगदी स्वस्तात माघारी परतत होते. रोहित-पंत हे शून्यावर बाद झाले. शिखरही 9 तर कोहली 16 धावा करुन तंबूत परतला. सूर्यकुमारने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण तो 27 धावा करुन बाद झाला. नंतर जाडेजाने पांड्यासोबत खेळ सावरला पण दोघेही प्रत्येकी 29 धावा करुन बाद झाले. शमीनेही 23 धावा केल्या, पण नंतरचे गडी पटापट बाद झाले, 38.5 ओव्हलमध्ये भारत सर्वबाद झाला आणि सामना इंग्लंडने 100 धावांनी जिंकला. इंग्लंडचा गोलंदाज रीस टोपले याने सामन्यात उत्तम प्रदर्शन दाखवत भारताचे 6 गडी बाद केले त्याला सामनावीर म्हणन गौरवण्यात आले.
हे देखील वाचा-
- IND vs WI T20 Squad : वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय टी20 संघाची घोषणा, कोहली-बुमराह संघात नाही, कसा आहे संपूर्ण स्कॉड?
- India Tour of West Indies 2022: भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे रंगणार सामने?
- Singapore Open 2022 : पीव्ही सिंधूसह एचएस प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत, मिथून-अश्मिता मात्र स्पर्धेबाहेर