India Tour of West Indies 2022: भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; कधी, कुठे रंगणार सामने?
India Tour of West Indies 2022: इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारताला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे.
India Tour of West Indies 2022: इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारताला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजनं (CWI) आणि बीसीसीआयनं (BCCI) बुधवारी भारतीय क्रिकेट संघाच्या वेस्ट इंडिज दौर्याची घोषणा केली. त्यानुसार, भारतीय संघ 22 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान वेस्ट इंडीजशी तीन एकदिवसीय सामने आणि पाच T20 सामने खेळतील. विशेष म्हणजे, या मालिकेतील अखेरचे दोन टी-20 सामने अमेरिकेतील (USA) फ्लोरिडा (Florida) येथे खेळले जाणार आहेत.
या दौऱ्याची सुरुवात पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे 22 जुलै रोजी एकदिवसीय सामन्यानं होईल. यानंतर उर्वरित दोन एकदिवसीय सामने याच मैदानावर 24 जुलै आणि 27 जुलैला खेळले जातील. त्यानंतर पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने तीन वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जातील. 29 जुलै रोजी पहिला T20 ब्रायन लारा क्रिकेट अकादमी (पोर्ट ऑफ स्पेन) येथे खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना वॉर्नर पार्कवर होणार आहे. त्यानंतर या मालिकेतील अखेरचे दोन टी-20 सामने 6 आणि 7 ऑगस्ट रोजी लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवले जातील.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
सामना | तारिख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 22 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
दुसरा एकदिवसीय सामना | 24 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
तिसरा एकदिवसीय सामना | 27 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
(सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील.)
टी-20 मालिकेचं वेळापत्रक-
सामना | तारिख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 29 जुलै 2022 | पोर्ट ऑफ स्पेन |
दुसरा टी-20 सामना | 1 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
तिसरा टी-20 सामना | 2 ऑगस्ट 2022 | सेंट किट्स आणि नेव्हिस |
चौथा टी-20 सामना | 6 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
पाचवा टी-20 सामना | 7 ऑगस्ट 2022 | फ्लोरिडा, अमेरिका |
(सर्व टी-20 सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील.)
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरननं भारताविरुद्ध आगामी मालिकेबद्दल सांगितले की, "आमचा युवा संघ ज्या प्रकारचे क्रिकेट खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे ते दाखवण्यासाठी आमचा सर्वोत्तम प्रयत्न करेल." भारताचा इंग्लंड दौरा 17 जुलैला संपणार आहे. त्या दौऱ्यात सहभागी खेळाडूंमधून ज्यांची निवड केली जाईल, ते थेट इंग्लंडहून वेस्ट इंडिजला रवाना होतील.
हे देखील वाचा-