Singapore Open 2022 : पीव्ही सिंधूसह एचएस प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत, मिथून-अश्मिता मात्र स्पर्धेबाहेर
Singapore Open : सिंगापुर ओपन 2022 या भव्य बॅडमिंटन स्पर्धेच्या राऊंड ऑफ-16 मध्ये पीव्ही सिंधू आणि एचएस प्रणॉयने आपआपले सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे.
![Singapore Open 2022 : पीव्ही सिंधूसह एचएस प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत, मिथून-अश्मिता मात्र स्पर्धेबाहेर PV Sindhu, HS Pranoy in Quarterfinals mithun and ashmita out of Singapore Open 2022 Singapore Open 2022 : पीव्ही सिंधूसह एचएस प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत, मिथून-अश्मिता मात्र स्पर्धेबाहेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/14/00df7ac3afc733168fa6408b1ed282351657787550_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Singapore Open Pre Quarterfinals : सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत (Singapore Open 2022) भारताची अव्वल दर्जाची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) आणि पुरुष गटात एचएस प्रणॉयने (HS Pranoy) राऊंड ऑफ-16 मध्ये विजय मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दुसरीकडे राऊंड 16 च्याच सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू मिथुन आणि अश्मिता यांना पराभव मिळाल्याने ते स्पर्धेबाहेर गेले आहेत.
भारतासाठी दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने गुरुवारी सिंगापूर ओपनमध्ये महिला एकेरीत व्हिएतनामच्या लिन ग्युयेनला मात दिली. सामन्यात लिनने पहिल्या सेटमध्ये दमदार खेळ करत सिंधूला 21-19 ने मात दिली. पण त्यानंतर सिंधूने दमदार असं पुनरागमन करत पुढील दोन्ही सेट 21-19 आणि 21-18 च्या फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला. आता ती थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली असून तिचा सामना चीनच्या हान युईशी होणार आहे.
प्रणॉयचाही रोमहर्षक विजय
भारताचा आघाडीचा पुरुष बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने जगातील चौथ्या क्रमाकांचा पुरुष बॅडमिंटनपटू चाउ टीन चेनला रोमहर्षक सामन्यात मात दिली. चीनी तायपेच्या चाउने प्रणॉयला पहिल्या सेटमध्ये 21-14 च्या मोठ्या फरकाने मात दिली. त्यानंतर दुसरा सेटही प्रणॉय पराभूत होणार असे वाटत असताना 22-20 च्या फरकाने प्रणॉयने सेट जिंकला. ज्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये प्रणॉयने 21-18 च्या फरकाने चाउला मात देत विजय मिळवला. आता उपांत्यपूर्व फेरीत प्रणॉयचा सामना जपानच्या कोडाई नारकोडा याच्याशी होईल.
60 seconds from a clash which saw an insane comeback by @PRANNOYHSPRI 🦁🔥#SingaporeOpen2022#SingaporeOpenSuper500#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/61TkFZuelL
— BAI Media (@BAI_Media) July 14, 2022
मिथुन आणि अश्मिता बाहेर
राऊंड ऑफ-16 मध्ये पुरुष एकेरीच्या सामन्यात मिथुन मंजूनाथ आणि महिला एकेरीत अश्मिताला पराभवाचा सामना करावा लागला. मिथुनला आयर्लंडच्या न्हाट ग्युयेनने 10-21, 21-18, 16-21 च्या फरकाने मात दिली. तर अश्मिताला चीनच्या हान युईने 9-21, 13-21 च्या फरकाने नमवलं. या पराभवामुळे मिथुन आणि अश्मिता दोघेही स्पर्धेबाहेर गेले आहेत.
हे देखील वाचा-
- Singapore Open 2022 : सिंधु-सायनाचं दमदार प्रदर्शन, दुसऱ्या फेरीत मिळवली जागा, प्रणॉयही विजयी
- Singapore Open 2022 : सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात, कोणते भारतीय सामिल? कशी असेल स्पर्धा? सर्व माहिती एका क्लिकवर
- ENG vs IND, 2nd ODI, Pitch Report : क्रिकेटच्या पंढरीत रंगणार दुसरा एकदिवसीय सामना; कशी असेल मैदानाची स्थिती, वाचा सविस्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)