IND vs BAN: फिरकीपटूंची कमाल! अश्विनचं अर्धशतक, कुलदीपच्या महत्त्वपूर्ण 40 धावा, भारताचा पहिला डाव 404 धावांवर आटोपला
भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचं (Ravichandran Ashwin) अर्धशतक आणि युवा खेळाडू कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) महत्वपूर्ण 40 धावांच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 404 धावांपर्यत मजल मारली.
IND vs BAN 1st Test Day 2: भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचं (Ravichandran Ashwin) अर्धशतक आणि युवा खेळाडू कुलदीप यादवच्या (Kuldeep Yadav) महत्वपूर्ण 40 धावांच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात सर्वबाद 404 धावांपर्यत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या (Shreyas Iyer) मदतीनं पहिल्या दिवशी 6 विकेट्सच्या मोबदल्यात 278 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर अश्विन आणि कुलदीप यादवच्या जोडीनं संघाचा डाव सावरत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं.
ट्वीट-
#TeamIndia all out for 404 in the first innings.
— BCCI (@BCCI) December 15, 2022
Half-centuries for Cheteshwar Pujara (90), Shreyas Iyer (86) & Ashwin Ravi (58)👏 👏
Valuable 40s from Rishabh Pant (46) and Kuldeep Yadav (40)@mdsirajofficial into the attack gets a wicket on the first delivery.#BANvIND pic.twitter.com/4esaKrTtfi
भारताचा पहिला डाव
नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार केएल राहुल (22 धावा) आणि शुभमन गिल (20 धावा) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर विराट कोहलीही अवघ्या एका धावेवर बाद झाला. भारतानं 48 धावांवर तीन विकेट्स गमावल्या. यानंतर चेतेश्वर पुजारानं संघाचा डाव सावरला.त्याला ऋषभ पंतचीही चांगली साथ मिळाली.भारताच्या डावातील 32 षटकात ऋषभ पंतच्या रुपात भारताला चौथा धक्का लागला. तो 46 धावा करून बाद झाला.त्यानतंर चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरनं संघाची धावसंख्या पुढं नेली. अखेरच्या सत्रात तैजूल इस्लामनं चेतेश्वर पुजाराला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.चेतेश्वर पुजारानं 90 धावांची उत्कृष्ट खेळी केली. दरम्यान, पहिल्या दिवशीच्या अखेरच्या चेंडूवर मेहंदी हसननं अक्षर पटेलला बाद केलं. श्रेयस अय्यर नाबाद 82 धावांसह क्रिजवर उभा आहे. पहिल्या दिवसाखेर भारतानं 6 विकेट्सच्या मोबदल्यात धाव फलकावर 278 धावा लावल्या आहेत. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या आठव्या षटकातच श्रेयस अय्यरनं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादवनं संघाचा डाव सावरला. रविचंद्रन अश्विनं 58 तर, कुलदीप यादवनं 40 धावांचं योगदान दिलं. भारताचा पहिला डाव 404 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून तैजूल इस्लाम आणि मेहंदी हसननं प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या. तर, इबादत हुसेन आणि खालीद अहमदच्या खात्यात एक-एक विकेट जमा झाली.
संघ
बांगलादेशची प्लेईंग इलेव्हन:
झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम, यासिर अली, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, इबादोत हुसेन.
भारताची प्लेईंग इलेव्हन:
शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
हे देखील वाचा-