PAK vs NZ: पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा; टीम साऊथीकडं कर्णधारपद
Kane Williamson Step Down As New Zealand Test Captain: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा (Team New Zealand) दिग्गज फलंदाज केन विल्यमसननं (Kane Williamson) कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला.
New Zealand Tour of Pakistan: दोन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान (New Zealand) यांच्यात येत्या 26-30 डिसेंबर 2022 दरम्यान पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. ज्यात टीम साऊथी (Tim Southee) न्यूझीलंडच्या संघाचं नेतृत्व करताना दिसेल. केन विल्यमसननं (Kane Williamson) राजीनामा दिल्यानंतर टीम साऊथीवर न्यूझीलंडच्या कसोटी संघाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. महत्वाचं म्हणजे, केन विल्यमनसनं कसोटी संघाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला असला तरी तो मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच एकदिवसीय आणि टी-20 संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
ट्वीट-
Squad News | The first Test against @TheRealPCB starts in Karachi on Boxing Day.
— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 14, 2022
More | https://t.co/cZdpKGOgNJ #PAKvNZ pic.twitter.com/urDBlmAURT
टीम साऊथी न्यूझीलंडच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार
केन विल्यमसननं राजीनामा दिल्यानंतर न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथीच्या खांद्यावर कसोटी संघाची जबाबदारी सोपवण्यात आली. पाकिस्तान दौऱ्यात टीम साऊथी न्यूझीलंडच्या कसोटी संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. तर, टॉम लॅथम संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. टीम साऊथी हा न्यूझीलंड संघाचा 31वा कसोटी कर्णधार बनला आहे. याआधी त्यानं न्यूझीलंडच्या टी-20 संघाचं नेतृत्वदेखील केलं आहे.
केन विल्यमसनचा कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा
न्यूझीलंड कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याबाबत केन विल्यमसन म्हणाला की, "कसोटीचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे'. कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवणं हा माझ्यासाठी बहुमान आहे. कसोटी क्रिकेट माझ्यासाठी अव्वल दर्जाचे आहे आणि त्याचा कर्णधार म्हणून मी आव्हानांचा आनंद घेतला. कर्णधार म्हणून तुमचे काम आणि कामाचा ताण वाढतो. माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर मला वाटले की कसोटी कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे." केन विल्यमसन हा न्यूझीलंडच्या महान कसोटी कर्णधारांपैकी एक आहे. केनच्या नेतृत्वाखाली किवी संघानं भारताचा पराभव करून पहिलं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकलं होतं. केनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या संघानं 38 पैकी 22 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामने गमावले आहेत आणि आठ सामने अनिर्णित ठरले आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघ:
टीम साऊथी (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉन्वे, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, ईश सोढी, ब्लेअर टिकनर, नील वॅगनर, केन विल्यमसन, विल यंग.
हे देखील वाचा-