Rohit Sharma Injured: भारताला मोठा धक्का! फिल्डिंगदरम्यान रोहित शर्माच्या हाताला दुखापत; मैदानातून थेट रुग्णालयात, एक्स-रेही काढणार
IND vs BAN 2nd ODI: तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे.
![Rohit Sharma Injured: भारताला मोठा धक्का! फिल्डिंगदरम्यान रोहित शर्माच्या हाताला दुखापत; मैदानातून थेट रुग्णालयात, एक्स-रेही काढणार IND vs BAN 2nd ODI: Team India Skipper Rohit Sharma sent to hospital for x-ray after left thumb injury During Filding Rohit Sharma Injured: भारताला मोठा धक्का! फिल्डिंगदरम्यान रोहित शर्माच्या हाताला दुखापत; मैदानातून थेट रुग्णालयात, एक्स-रेही काढणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/07/3a6f10edfa67536a8c70511326c6c6651670403765798266_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs BAN 2nd ODI: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये (Shere Bangla National Stadium) भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. मात्र, याचदरम्यान भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर येत आहे. फिल्डिंगदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाताला दुखापत झाली असून एक्स-रेसाठी त्याला रुग्णालयात पाठवण्यात आलंय, अशी माहिती मिळत आहे.
बांगलादेशच्या डावातील दुसऱ्या षटकात मोहम्मद सिराजच्या हातात चेंडू सोपवून रोहित शर्मा स्लीपला फिल्डिंगसाठी उभा राहिला. या षटकात मोहम्मद सिराजनं टाकलेला राऊंड ऑफ द विकेटला चेंडू टाकला, जो अनामूलच्या बॅटला लागून रोहित शर्माच्या दिशेनं गेला. या चेंडूवर झेल पकडण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागला. ज्यानंतर त्याला लगेचच मैदानाबाहेर पाठवण्यात आलं. रोहित शर्माच्या जागी युवा गोलंदाज रजत पाटीदार फिल्डिंगसाठी मैदानात आलाय.
बीसीसीआयचं ट्वीट-
Update: India Captain Rohit Sharma suffered a blow to his thumb while fielding in the 2nd ODI. The BCCI Medical Team assessed him. He has now gone for scans. pic.twitter.com/LHysrbDiKw
— BCCI (@BCCI) December 7, 2022
व्हिडिओ-
Rohit sharma got injured #Rohitsharma pic.twitter.com/4IAOHpt1Ua
— Adnan Ansari (@AdnanAn71861809) December 7, 2022
केएल राहुलच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी
दरम्यान, कॉमेन्ट्री करताना विवेक राझदाननं म्हणाले की, रोहित शर्माची दुखापत गंभीर असेल तर तो कदाचित फलंदाजीसाठी मैदानात उतरणार नाही. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसतोय, जो या सामन्यात विकेटकिपरची भूमिका बजावत आहे. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला एक विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात लीटन दासला बाद न करता आल्यानं रोहित शर्मावर टीका करण्यात आली होती. तर, निर्णायक झेल सोडल्यानं नेटकऱ्यांनी केएल राहुलला ट्रोल केलं होतं.
रोहित शर्माच्या दुखापतीनं टेन्शन वाढवलं
रोहित शर्माची दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. तत्याची दुखापत गंभीर असल्यास त्याला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातूनही वगळलं जाण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हेतर, बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतही रोहित शर्माला विश्रांती दिली जाऊ शकते.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)