Mohammed Siraj Sledging: मैदानातच राडा! मोहम्मद सिराज थेट बांगलादेशच्या फलंदाजाशी भिडला, पाहा व्हिडिओ
IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा आणि महत्त्वाचा एकदिवसीय सामना ढाकाच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे.अ

IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा आणि महत्त्वाचा एकदिवसीय सामना ढाकाच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दासनं (Litton Das) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आणि वाशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) भेदक माऱ्यानं लिटन दासचा निर्णय अयोग्य ठरवला. विशेषत: मोहम्मद सिराजच्या वेगवान गोलंदाजीला कोणाकडेच उत्तर नव्हते. दरम्यान, मोहम्मद सिराज बांगलादेशचा फलंदाज नजमुल शांतोसोला स्लेज करताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ज्यात भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज बांगलादेशचा फलंदाज नजमुल शांतोसोबत स्लेजिंग करताना दिसतोय.
व्हिडिओ-
Siraj vs shanto 💥💥 #INDvBAN 2nd ODI #siraj #RohitSharma #ViratKohli𓃵 indvsban pic.twitter.com/ldIYsRWQfb
— Nikesh Gohite🇮🇳 (@nikesh_gohite) December 7, 2022
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सिराजने शांतोला एक स्क्रॅम्बल सीम बॉल टाकला, ज्यामुळं तो पूर्णपणे चुकला आणि चेंडू थेट विकेटकिपरच्या हातात गेला. चेंडू टाकल्यानंतर लगेचच सिराज नजमुल हुसेनकडं पोहोचला आणि त्याला काहीतरी बोलू लागला. पण शांतोनं कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही आणि तो तसाच उभा राहिला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सिराजची भेदक गोलंदाजी
मोहम्मद सिराजनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात दमदार गोलंदाजी केली. त्यानं अवघ्या 32 धावांत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या सामन्यातही सिराजनं आक्रमक गोलंदाजी केली. ज्यात त्यानं अनामूल हक आणि लिटन दासच्या रूपात दोन महत्त्वाची विकेट्स घेतल्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही सिराजची चमक कायम आहे. या सामन्यात सिराज पाच विकेट्स घेतो का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
मोहम्मद सिराजचा पराक्रम
कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद सिराज अव्वल स्थानी पोहचलाय. त्यानं 14 सामन्यात 23 विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर युजवेंद्र चहल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 21 विकेट्सची नोंद आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारताचा युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णानं कॅलेंडर वर्षात 15 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर शार्दूल ठाकून 15 विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
