IND vs AUS 3rd T20: कॅमेरून ग्रीन- टीम डेव्हिडची वादळी अर्धशतकं; टी-20 मालिका जिंकण्यासाठी भारताला 187 धावांची गरज
IND vs AUS 3rd T20: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम सुरु असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारतासमोर 187 धावाचं लक्ष्य ठेवलंय.
IND vs AUS 3rd T20: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम सुरु असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारतासमोर 187 धावाचं लक्ष्य ठेवलंय. नाणफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कॅमेरून ग्रीननं (Cameron Green) (21 चेंडू 52 धावा) संघाला दमदार सुरूवात करून दिली. परंतु, भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानं चौथ्या षटकात आरोन फिंचच्या रुपात ऑस्ट्रेलियाला संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूत भुवनेश्वर कुमारनं कॅमेरूनला आपल्या जाळ्यात अडकवत ऑस्ट्रेलियाच्या संघाला बॅकफूटवर ढकललं. परंतु, अखेरच्या काही षटकात तडाखेबाज फलंदाज टीम डेव्हिड (Tim David) आणि डॅनियस सॅम्सनं (Daniel Sams) फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला सन्माननीय धावसंख्येपर्यंत पोहचवलं. भारताकडून अक्षर पटेलनं (Axar Patel) चांगली उत्कृष्ट गोलंदाजी केली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची चांगली सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर कॅमेरून ग्रीन आणि आरोन फिंचनं पहिल्या तीन षटकात 10 च्या सरासरीन धावसंख्या 30 च्या पुढं नेली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 44 वर असताना आरोन फिंच बाद झाला. मात्र, त्यानंतरही कॅमेरून ग्रीननं आक्रमक खेळी सुरुच ठेवली. ऑस्ट्रेलियाच्या डावातील पाचव्या षटकातील अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारनं कॅमरूनला बाद करून भारताला दुसरी विकेट्स मिळवून दिली. स्टीव्ह स्मिथ (10 चेंडू 9 धावा), ग्लेन मॅक्सवेल (11 चेंडू 6 धावा), जोश इंग्लिस (22 चेंडू 24 धावा), मॅथ्यूवेड (0) स्वस्तात माघारी परतले. मात्र, अखेरच्या काही षटकात टीम डेव्हिड आणि डॅनियल सॅम्सनं जोरदार फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला 187 धावसंख्येपर्यंत पोहचवलं. भारताकडून अक्षर पटेलनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स प्राप्त झाली.
संघ-
भारताची प्लेइंग इलेव्हन:
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन:
आरोन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), डॅनियल सॅम्स, पॅट कमिन्स, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.
हे देखील वाचा-