IND vs AUS 3rd T20: भुवनेश्वर कुमार इन, ऋषभ पंत आऊट! ऑस्ट्रेलियाच्या संघातही एक बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जातोय.
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जातोय. या निर्णायक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी एक बदल केलाय. भारतानं ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) जागी भुवनेश्वर कुमारचा (Bhuvneshwar Kumar) समावेश केला आहे. तर. ऑस्ट्रेलियाच्या संघातही एक बदल पाहायला मिळतोय.ऑस्ट्रेलियानं सीन अॅबॉटच्या (Sean Abbott) जागी जोश इंग्लिसला (Josh Inglis) प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी दिलीय.
कधी, कुठं पाहणार सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज (25 सप्टेंबर) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
ट्वीट-
🚨 Toss Update 🚨#TeamIndia have elected to bowl against Australia in the third #INDvAUS T20I.
— BCCI (@BCCI) September 25, 2022
Follow the match ▶️ https://t.co/xVrzo737YV pic.twitter.com/QkinggmHiU
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 25 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 14 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, 10 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेल्या अखेरच्या पाच टी-20 सामन्यापैकी भारतानं तीन सामने जिंकले आहेत. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. राजीव गांधी स्टेडियमवर आतापर्यंत दोन टी-20 सामने खेळले गेले. या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं एक विजय मिळवलाय. तर, एक सामना अनिर्णित ठरलाय.या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या 209 इतकी आहे. जी भारतानं वेस्ट इंडीजविरुद्ध खेळली होती.
संघ-
भारताची प्लेइंग इलेव्हन:
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन:
आरोन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड (विकेटकिपर), डॅनियल सॅम्स, पॅट कमिन्स, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.
हे देखील वाचा-