एक्स्प्लोर

IND Vs AUS 2nd T20 | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियात आज दुसरा टी20 सामना; टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ टी20 सामन्यांची मालिका जिंकण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आज होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडिया विजय मिळवून मालिका खिशात घालणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

IND vs AUS | एकदिवसीय सामन्यांच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 1-2 असा पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला. रविवारी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर दोन्ही संघांमध्ये दुसरा टी20 सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासमोर दुसरा सामना जिंकत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. परंतु, ऑस्ट्रेलियासाठी दुसऱ्या टी20 सामन्यात वापसी करणं अवघड असणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात दुखापतींचं सत्र सुरुच असून अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत.

डेव्हिड वॉर्नर आधीपासून सीरिजमधून बाहेर आहे. कर्णधार एरॉन फिंचलाही पहिल्या टी20 सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात फिंच खेळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. जर दुसऱ्या टी20 सामन्यांत फिंच खेळला नाही तर हा यजमान संघासाठी मोठा धक्का असणार आहे. जर फिंच आजच्या सामन्यात गैरहजर राहिला तर संघासाठी धावांचा डोंगर रचण्याची जबाबदारी स्टीव्ह स्मिथवर असणार आहे.

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी विकेट गमावले होते. या सामन्यात यजमान संघ पहिल्या सामन्यातील चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील. गोलंदाजीमध्ये शेवटच्या काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांनी फारसं चांगलं प्रदर्शन केलं नाही. अशातच शेवटच्या ओव्हर्समध्ये टीम इंडियासाठी धावा काढणारा भारताचा स्टार खेळाडू रविंद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे आजच्या सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही, ही ऑस्ट्रेलियासाठी दिलासादायक बाब ठरू शकते.

चहलला मिळू शकते संधी

रवींद्र जाडेजा संघाबाहेर असणं टीम इंडियासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. शिखर धवनसोबत मैदानावर उतरलेला लोकेश राहुल आणि रवींद्र जाडेजा यांच्या धमाकेदार खेळीमुळेच टीम इंडिया पहिल्या टी20 सामन्यात 161 धावा करू शकली.

पहिल्या टी20 सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली देखील फारशी चांगली खेळू करू शकला नव्हता. जाडेजाच्या जागी कनकशन सब्सीटियूट म्हणून युजवेंद्र चहलचा संघात समावेश करण्यात आला आहे. चहलने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंना माघारी धाडलं होतं. परंतु, त्यावेळी चहलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. अशातच आज चहलला संघात प्राथमिकता देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चहल व्यतिरिक्त टी. नटराजननेही धमाकेदार खेळी केली होती. कोहलीने पहिल्या टी20 मध्ये जसप्रीत बुमराहला संघाबाहेर ठेवलं होतं. दुसऱ्या सामन्यात बुमराहची वापसी होण्याची शक्यता आहे.

संभाव्य संघ :

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयंक अग्रवाल, लोकेश राहुल (उपकर्णधार, विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दूल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सॅनी, दीपक चहर, टी.नटराजन.

आस्ट्रेलिया : एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स कैरी, पैट कमिंस (उपकर्णधार), नाथन लॉयन, जोश हेजलवुड, मोइजेज हेनरिक्स, मार्नस लाबुशॅन, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल सॅम्स, एंड्रयू टाई, स्टीव स्मिथ, मैथ्यू वेड, मिशेल स्टार्क, एडम जाम्पा.

महत्त्वाच्या बातम्या : 

India vs Australia T20: पहिल्या टी- 20 सामन्यात भारताचा विजय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget