एक्स्प्लोर

रोहितचं शतक, रिंकूचं अर्धशतक, भारताचे अफगाणिस्तानसमोर 213 धावांचे विराट आव्हान

IND vs AFG 3rd T20 Score Live: रोहित शर्माचं वादळी शतक आणि रिंकूंच्या विस्फोटक अर्धशतकाच्या बळावर भारताने 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 212 धावांचा डोंगर उभारला.

IND vs AFG 3rd T20 Score Live: रोहित शर्माचं वादळी शतक आणि रिंकूंच्या विस्फोटक अर्धशतकाच्या बळावर भारताने 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 212 धावांचा डोंगर उभारला. रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधील पाचवे शतक ठोकले तर रिंकू याने पुन्हा एकदा अर्धशतकी तडाखा दिला. अफगाणिस्तानकडून फरीद याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. अफगाणिस्तानला अखेरचा टी 20 सामना जिंकण्यासाठी 213 धावांचे आव्हान मिळाले आहे.

रोहित शर्मा-रिंकू सिंह यांनी डाव सावरला - 

अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. अवघ्या 22 धावांत भारताचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. पण त्यानंतर अनुभवी रोहित शर्माने सर्व सुत्रे हातात घेतली. युवा रिंकू सिंह याला हाताशी धरत रोहित शर्माने भारताच्या डावाला आकार दिला. रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी पाचव्या विकेटसाठी दीडशतकी भागिदारी केली. दोघांच्या भागिदारीच्या जोरावर भारताने द्वशतकी धावसंख्या उभारली. रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली, त्यानंतर अफगाण गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. रोहित शर्मा आणि रिंकू यांच्यामध्ये पाचव्या विकेटसाठी 190 धावांची भागिदारी झाली. त्यांनी अवघ्या 96 चेंडूत 190 धावा जोडल्या. यामध्ये रोहित शर्माने 113 आणि रिंकूने 69 धावांचे योगदान दिले. रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांच्यापुढे अफगाण गोलंदाजी कमकुवत जाणवली. 

रोहितचं शतक - 

कठीण परिस्थितीमध्ये रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या दोन्ही सामन्यात रोहित शर्माला खातेही उघडता आले नव्हते. पण बेंगलोरच्या मैदानात रोहित शर्माने अनुभव पणाला लावत अफगाण गोलंदाजांची धुलाई केली. रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधील पाचवे शतक ठोकले. टी 20 क्रिकेटमध्ये पाच शतके ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरलाय. याआधी असा पराक्रम एकाही फलंदाजाला करता आला नाही. रोहित शर्माने अफगणिस्तानच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेतली. रोहित शर्माने 69 चेंडूमध्ये नाबाद 121 धावांची खेळी केली. यामध्ये आठ षटकार आणि 11 चौकारांचा समावेश आहे. 

रिंकूचं अर्धशतक - 

आघाडीचे फलंदाज फेल ठरल्यामुळे रिंकू सिंह याच्यावर मोठी जबाबदारी होती. रिंकू सिंह याने पुन्हा एकदा कठीण परिस्थितीमध्ये धमाकेदार खेळी केली. रिंकू सिंह याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. रिंकू सिंह याने रोहित शर्माला चांगली साथ दिली. अखेरीस रिंकू सिंह याने आक्रमक फलंदाजी करत षटकारांचा पाऊस पाडला. रिंकू सिंह याने 39 चेंडूत नाबाद 69 धावांची खेळी केली. यामध्ये सहा षटकारांचा आणि दोन चौकारांचा समावेश आहे. 

संजू-विराट फ्लॉप

अफगाणिस्तानच्या भेदक माऱ्यापुढे भारताचे तगडे फलंदाज ढेपाळले. विराट कोहलीला तर खातेही उघडता आले नाही. त्याशिवाय तिसऱ्या टी 20 सामन्यात संधी मिळालेला संजू सॅमसनही अपयशी ठरला. संजू सॅमसन यालाही खातेही उघडता आले नाही. टी 20 विश्वचषकापूर्वी होत असलेल्या अखेरच्या टी 20 सामन्यात दिग्गज फलंदाजांनी नांगी टाकली. दुसऱ्या सामन्यात विजयाचे शिल्पकार ठरलेले शिवम दुबे आणि यशस्वी जायस्वाल यांनाही मोठी खेळी करता आली नाही. यशस्वी जायस्वाल फक्त चार धावा काढून तंबूत परतला. तर शिवम दुबे याने फक्त एक धाव काढली. दुसऱ्या सामन्यात या दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत अर्धशतके ठोकली होती. पण बेंगलोरच्या मैदानात या फलंदाजांना अपयश आले. अफगाणिस्तानकडून फरीद अहमद याने अचूक टप्प्यावर मारा केला. त्याने सुरुवातीच्या तीन षटकात फक्त 10 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. फरीद याने विराट कोहली, यशस्वी जायस्वाल आणि संजू सॅमसन यांना गुंडाळले. तर उमरजई याने शिवब दुबे याचा अडथळा दूर केला. सहा षटकांमध्ये भारताने फक्त 30 धावा केल्या असून चार फलंदाज बाद झाले आहेत.  

अफगाणिस्तानची गोलंदाजी - 

रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी अफगाण गोलंदाजांची धुलाई केली. नाणेफेक गमावल्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक सुरुवात केली होती. अवघ्या 22 धावांत भारताच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले होतं. पण त्यानंतर रोहित आणि रिंकू यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. फरीद याने तीन विकेट घेतल्या तर उमरजई याने एक विकेट घेतली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये ''घरवापसीची पे चर्चा''
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
विधानसभा निवडणुकीच्या तयारीली वेग, निवडणूक आयोग लागले कामाला
Embed widget