ENG Vs IND 3rd ODI: आज ठरणार! एकदिवसीय मालिका कोण जिंकणार? पाहा भारत- इंग्लंड यांच्यातील हेड टू हेड रेकार्ड
भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज मॅंचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे खेळवला जाणार आहे.
England vs India Head To Head Record: भारत आणि इंग्लंड (ENG vs IND) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना आज मॅंचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं एकतर्फी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून इंग्लंडनं पुनरागमन केलं. त्यानंतर आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असेल.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शिखन धवनच्या सलामी जोडीनं भारताला 10 विकेट्सनं विजय मिळवून दिला होता. परंतु, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोघंही फ्लॉफ ठरले. तर, विराट कोहलीलाही काही खास कामगिरी करता आली नाही. दरम्यान, 247 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला 146 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि इंग्लंडनं 100 धावांनी सामना जिंकला.
भारत आणि इंग्लंड हेड टू हेड रेकार्ड
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 105 एकदिवसीय सामने खेळले गेले आहे. त्यापैकी 56 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, 44 सामन्यात पराभव स्वीकाराला आहेत. यातील दोन सामने टाय झाले आहेत. भारतानं मायदेशात इंग्लंडविरुद्ध 33 सामने जिंकले आहेत. तर, इंग्लंडनं त्यांच्या मायभूमीवर भारताला 23 वेळा पराभूत केलं आहे.
इंग्लंडविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह
हे देखील वाचा-
- PV Sindhu: पीव्ही सिंधूची जबरदस्त कामगिरी! सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झि यिवर पडली भारी
- Singapore Open: पीव्ही सिंधू- वांग झि यि यांच्यात आज रंगणार थरार; कोणाचं पारडं राहिलंय जड, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
- Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय खेळाडूंची घोषणा