एक्स्प्लोर

धोनीला 'ते' ग्लोव्ज घालून खेळता यावे यासाठी बीसीसीआयचा पुढाकार, प्रशासकीय अध्यक्ष म्हणतात...

विश्वचषकातील भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात टीम इंडियाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने पॅरा कमांडोजच्या युनिफॉर्मवर दिसणारा बलिदान बॅज आपल्या विकेट किपिंग ग्लोव्जवर लावला होता. धोनीने ग्लोव्जवर लावलेला सेनादलाचा बलिदान बॅज काढून ठेवावा, अशी विनंती आयसीसीने बीसीसीआयला केली आहे.

मुंबई : विश्वचषकातील भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात टीम इंडियाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीने पॅरा कमांडोजच्या युनिफॉर्मवर दिसणारा बलिदान बॅज आपल्या विकेट किपिंग ग्लोव्जवर लावला होता. धोनीने ग्लोव्जवर लावलेला सेनादलाचा बलिदान बॅज काढून ठेवावा, अशी विनंती आयसीसीने बीसीसीआयला केली आहे. त्यानंतर आता याप्रकरणावर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी धोनीच्या बाजूने भूमिका मांडली आहे. महेंद्रसिंग धोनीला विश्वचषकातल्या उर्वरित सामन्यांमध्येही त्याचे बहुचर्चित ग्लोव्ज परिधान करता यावेत, यासाठी बीसीसीआयने पुढाकार घेतला आहे. विनोद राय याबाबत म्हणाले की, आम्ही आमच्या खेळाडूंसोबत उभे आहोत. धोनीने ग्लोव्जवर लावलेला बॅज हा कोणत्याही धर्माचे प्रतीक नाही, तसेच धोनी जाहिरातबाजी म्हणूनही त्याचा वापर करत नाही. त्यामुळे धोनीला तो बॅज लावून खेळण्यात अडचण यायला नको. राय म्हणाले की, धोनीला हे बॅज ग्लोव्जवर लावून खेळता यावे, यासाठी आम्ही आयसीसीकडे मागणी करणार आहोत. यासंदर्भात बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात आज बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. धोनीच्या मनात भारतीय सेनादलाविषयी आदराची भावना आहे. सेनादलाच्या पॅरा रेजिमेंटने त्याला मानद लेफ्टनंट कर्नलचा हुद्दा देऊन सन्मानितही केले आहे. धोनीने विश्वचषक सामन्यात बलिदान बॅज असलेले ग्लोव्ज वापरुन भारतीय सेनादलाविषयीची आपल्या मनातली भावना पुन्हा अधोरेखित केली. धोनीच्या या कृतीची भारतीय चाहत्यांकडून खूपच प्रशंसा होत आहे. पण तो बॅज वापरणं नियमात बसत नसल्याचं सांगून, आयसीसीने धोनीला तो बॅज काढून ठेवायला सांगण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे. यावर धोनी काय करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. टीम इंडियाने विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून विजयी सलामी दिली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून मात केली. दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांत केवळ 227 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने 48 षटकांत चार गडी गमावत हे आवाहन सहज पार केलं.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK U19 Asia Cup Live Streaming: सण दिवाळीचा, थरार भारत-पाकिस्तानचा! रविवारी रंगणार हायव्होल्टेज सामना, टीव्हीपासून मोबाईलपर्यंत कुठे, कधी LIVE पाहाल? जाणून घ्या A टू Z
सण दिवाळीचा, थरार भारत-पाकिस्तानचा! रविवारी रंगणार हायव्होल्टेज सामना, टीव्हीपासून मोबाईलपर्यंत कुठे, कधी LIVE पाहाल? जाणून घ्या A टू Z
IPL 2027 Trade MI-PBKS : मुंबई-पंजाबमध्ये IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! हार्दिक पांड्याच्या बदल्यात MIमध्ये तगडा खेळाडू, पलटणचा नवा कॅप्टन कोण? नाव पण ठरलं
मुंबई-पंजाबमध्ये IPL इतिहासातील सर्वात मोठी डील! हार्दिक पांड्याच्या बदल्यात MIमध्ये तगडा खेळाडू, पलटणचा नवा कॅप्टन कोण? नाव पण ठरलं
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
IND vs NZ 2nd ODI : पावसाने वाचवली लाज! डकवर्थ-लुईसचा ट्विस्ट अन् न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा अवघ्या 4 धावांनी विजय, मालिकेत 2-0 मुसंडी
पावसाने वाचवली लाज! डकवर्थ-लुईसचा ट्विस्ट अन् न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा अवघ्या 4 धावांनी विजय, मालिकेत 2-0 मुसंडी

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दह
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
CJP Protest in Kochi: कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
Mumbai Local Train Fight : चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
Embed widget