एक्स्प्लोर

Prithvi Shaw : पृथ्वी शॉविरोधातील विनयभंगाची तक्रार बिनबुडाची, सपनाच्या आरोपात तथ्य नाही - पोलिसांची कोर्टात माहिती

Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update :  क्रिकेटर पृथ्वी शॉविरोधातील विनयभंगाची तक्रार बिनबुडाची असल्याचं मुंबई पोलिसांनी आज (सोमवारी) कोर्टात सांगितले.

Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update :  क्रिकेटर पृथ्वी शॉविरोधातील विनयभंगाची तक्रार बिनबुडाची असल्याचं मुंबई पोलिसांनी आज (सोमवारी) कोर्टात सांगितले. सोशल मीडियावरील प्रसिद्ध सपना गिलनं पृथ्वीविरोधात केलेल्या आरोपांत कोणतंही तथ्य आढळलं नाही, असे मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितले.  आयपीएल सुरु होण्याआधी पृथ्वी शॉ वादात अडकला होता. त्याप्रकरणी सपना गिल हिने कोर्टात धाव घेतली होती. आता याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कोर्टात आपला रिपोर्ट सादर केलाय, त्यामध्ये पृथ्वी शॉ याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे पोलिसांनी सांगितलेय. 

पृथ्वी किंवा त्याच्या मित्रानं सपनाला कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह स्पर्श केल्याचं समोर आलेलं नाही. मुंबई पोलिसांचा याप्रकरणी दंडाधिकारी कोर्टात अहवाल सादर करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या या अहवालामुळे पृथ्वी शॉ याला मोठा दिलासा मिळाला आहे. 

Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : पृथ्वी शॉ - सपना गिल सेल्फी प्रकरण
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आयपीएलआधी वादात अडकला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये अभिनेत्री सपना गिलसोबतच्या वादामुळे पृथ्वी शॉ चर्चेत आला. मुंबईच्या रस्त्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. सपना गिलने पृथ्वीच्या मित्राच्या गाडीच्या काचा फोडल्या असा आरोप आहे. त्यानंतर अभिनेत्री सपना गिलला पोलिसांनी अटक केली होती. सपना नंतर जामीनावर बाहेर आली होती. सपना गिल हिने याप्रकरणी कोर्टात धाव घेतली होती.  पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष सुरेंद्र यादव यांच्याविरोधात सपना गिल हिने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी भादवि कलम 354, 509, 324 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राविरुद्ध विनयभंग आणि बॅटने मारणे यासह अनेक प्रकरणासह सपना गिलने तक्रार दाखल केली होती. एवढेच नाही तर सपनाने सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्रही दिले आहे. यामध्ये तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाचा उल्लेख होता. 

Who is Sapna Gill : कोण आहे सपना गिल?
सपना गिल भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सपना तिचं ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये हळूहळू आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे. सपना गिल सध्या 26 वर्षांची आहे. सपनाचा जन्म पंजाबची राजधानी चंदीगड येथे झाला. सपनाने 'काशी अमरनाथ' आणि 'निरहुआ चलल लंदन' या चित्रपटांमध्ये भोजपुरी सुपरस्टार अभिनेता रवि किशन आणि दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या अद्याप एवढी प्रसिद्धी मिळाली नसली. तरी पृथ्वी शॉसोबतच्या वादामुळे सपना गिल चर्चेत आली आहे.

Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case : काय आहे प्रकरण?
मुंबईतील हॉटेलबाहेर भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ याचा एका तरुणीसोबत वाद झाला.  सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाला असल्याचं समोर आलं. पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढताना हाणामारी झाल्याचं यात सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना जोगेश्वरी लिंक रोड येथील लोटसच्या पेट्रोल पंपाजवळ घडल्याची माहिती आहे. पृथ्वी शॉच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ याचा एका हॉटेलात पार्टी सुरु असताना सेल्फी काढण्यावरुन वाद झाला. त्यानंतर हॉटेलमधून शॉ दुसऱ्या कारने घराकडे निघाला होता. त्यादरम्यान त्याच्या मित्राच्या कारमध्ये तो असल्याचं संबधितांना वाटलं आणि तरुणी आणि तिच्या मित्रांनी त्या कारवर हल्ला केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray bodyguard :सभास्थळी जाण्यापासून सुरक्षारक्षकांना पोलिसांनी रोखलं, उद्धव ठाकरे भडकलेABP Majha Headlines | 06 PM TOP Headlines 6 PM 06 November 2024 | एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर | ABP Majha | 06 NOV 2024Muddyache Bola Tuljapur : तुळजापुरात 'जरांगे फॅक्टर' महत्त्वाचा ठरेल ? : मुद्द्याचं बोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
खाण तशी माती... 1 मिनिट अगोदर अर्ज माघारी घेतला; तानाजी सावंतांविरुद्ध शड्डू ठोकलेला ठाकरेंचा शिलेदार मातोश्रीवर
US Election Result 2024 : 'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
'दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं', ट्रम्प तात्यांनी अमेरिकेत गुलाल उधळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Embed widget