(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर, वॉशिंग्टन सुंदरला लॉटरी; आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी सूर्या ब्रिगेडची घोषणा
Team India : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामनांच्या मालिकेसाठी म्हणजेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली : बीसीसीआयनं भारताच्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. तर, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारताच्या टी 20 संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव आहे. तर, रोहित शर्मा भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे.
भारताचा टी 20 संघ
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रमनदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार व्यषक, आवेश खान, यश दयाल
मयंक यादव आणि शिवम दुबे हे दोघे दुखापतग्रस्त असल्यानं त्यांना संघात स्थान देण्यात आलं नाही. तर, रियान पराग देखील दुखापतग्रस्त असल्यानं त्याला संघात स्थान मिळालं नाही, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी 20 मालिका 8 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. 8 नोव्हेंबर, 10, 13 आणि 15 तारखेला चार टी 20 सामने होणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीतील लढतीनंतर पहिल्यांदा आमने सामने येणार आहेत.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी
रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमरहा (उपकॅप्टन), यशस्वी जयस्वाल , अभिमन्यू इश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जरेल (विकेटकपीर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीशकुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर,
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि खलील अहमद
मोहम्मद शमीची संधी हुकली?
भारताचा अनुभवी आणि आक्रमक वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर त्यानं एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. रणजी ट्रॉफीत तो कर्नाटक आणि मध्य प्रदेश विरुद्ध खेळेल. त्यानंतर मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत स्थान मिळेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र, बीसीसीआयनं जाहीर केलेल्या कसोटी संघात मोहम्मद शमीला स्थान मिळालेलं नाही.
दरम्यान, न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात मिळून 11 विकेट घेणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी देण्यात आली आहे.
🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) October 25, 2024
Squads for India’s tour of South Africa & Border-Gavaskar Trophy announced 🔽#TeamIndia | #SAvIND | #AUSvIND pic.twitter.com/Z4eTXlH3u0
इतर बातम्या :