ICC Player Of The Month Award: पहिल्यांदाच श्रीलंकेच्या 'या' खेळाडूनं जिंकलाय 'प्लेयर ऑफ द मंथ' चा पुरस्कार
ICC Men Player Of The Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं अर्थात आयसीसीनं (ICC) मे महिन्यातील प्लेयर ऑफ मंथ चा पुरस्कार जाहीर केलाय.
ICC Men Player Of The Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं अर्थात आयसीसीनं (ICC) मे महिन्यातील 'प्लेयर ऑफ मंथ'चा पुरस्कार जाहीर केलाय. त्यानुसार, एँजेलो मॅथ्यूजनं (Angelo Mathews) मे महिन्यातील प्लेयर ऑफ मंथचा पुरस्कार जिंकला आहे. पहिल्यांदाच त्यानं हा पुरस्कार जिंकलाय.
मे महिन्यात एँजिलो मॅथ्यूजची चमकदार कामगिरी
श्रीलंकेच्या अनुभवी ऑलराऊंडर एँजेलो मॅथ्यूजनं चमकदार कामगिरी करून दाखवली होती. त्यानं बांग्लादेशविरुद्ध दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. या मालिकेतील तीन डावात त्यानं 172 च्या सरासरीनं 344 धावा केल्या होत्या. यादरम्यान, त्यानं 199 धावांची धमाकेदार खेळी केली होती. या मालिकेत एँजेलो मॅथ्यूजनं महत्वाची भूमिका बजावत श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवून दिला होता.
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड
आसीसीनं क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो.
असिता फर्नांडो आणि मुशफिकुर रेहमान शर्यतीतून बाहेर
आयसीसीनं मे महिन्याच्या प्लेयर ऑफ मंथ च्या पुरस्कारासाठी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिता फर्नांडो आणि बांग्लादेशचा मुशफिकुर रहीमला नामांकीत करण्यात आलं होत. असितानं मे महिन्यात बांग्लादेशविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं दोन कसोटी सामन्यात 16. 62 च्या सरासरीनं 13 विकेट्स घेतले होते. तर, याच मालिकेत बांग्लादेशच्या मुशफिकुर रहीम सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.
हे देखील वाचा-