Shoaib Akhtar: टी-20 विश्वचषकाच्या फायनलनंतर शोएब अख्तरला रडू कोसळलं, कारण ऐकून व्हाल हैराण
Shoaib Akhtar: या विश्वचषकात बाबर आझमनं सर्वाधिक 303 धावा केल्या आहेत. तर, दुसरीकडं डेव्हिड वार्नरनंही 289 धावा केल्या.
Shoaib Akhtar on Player of the Tournament: टी-20 विश्वचषक 2021 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा (NZ Vs AUS) 8 विकेट्सनं पराभव करत प्रथमच विश्वचषकाचा किताब जिंकलाय. दुबईत खेळल्या गेलेल्या या मोठ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू विजयाचं हिरो ठरले. या सामन्यात मिचेल मार्शनं नाबाद 77 धावा केल्या, तर सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं 38 चेंडूत 53 धावांची धडाकेबाज खेळी केली. ज्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या संघाला चांगली सुरुवात मिळाली. या सामन्यानंतर मार्शला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आलं. तर, स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा डेव्हिड वार्नरला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून घोषीत करण्यात आलं. परंतु, डेव्हिड वार्नरला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' घोषीत केल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर का रडला? यामागचं कारण समोर आलंय
या स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या डेव्हिड वार्नरला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट घोषीत केल्यानंतर शोएब अख्तर संतापलाय. शोएबच्या मते, या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार डेव्हिड वॉर्नरला नव्हे तर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सलामीवीर बाबर आझमला मिळायला हवा होता. त्याच्यावर अन्याय होत आहे. तसेच हा निर्णय अयोग्य असल्याचंही त्यानं म्हटलंय.
या विश्वचषकात बाबर आझमनं सर्वाधिक 303 धावा केल्या आहेत. तर, दुसरीकडं डेव्हिड वार्नरनंही 289 धावा केल्या. परंतु, डेव्हिड वार्नरनं मागील 3 सामन्यात धमाकेदार खेळी केली. त्यानं वेस्टइंडिज विरुद्ध 89, पाकिस्तान विरुद्ध 49 आणि फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध 53 धावांची आक्रमक खेळी केली. ज्यामुळं ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनमध्ये पोहचला. त्यानंतर फायनलमध्ये पोहचला आणि विश्वचषकाचा किताब आपल्या नावावर केला.
दरम्यान, बाबर आझम पाकिस्तानला विजेतेपदापर्यंत मिळवून देण्यास अपयशी ठरला. त्यामुळे 14 धावांच्या फरकाकडं दुर्लक्ष करून बाबर ऐवजी वॉर्नरला हा पुरस्कार देण्यात आलाय. याआधी डेव्हिड वॉर्नरला आयपीएलदरम्यान फ्लॉप मानून अनेकांनी त्याला निवृत्तीसाठी पात्र ठरवले होतं. मात्र, या खेळाडूनं पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करून दाखवलं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-