(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hardik Pandya: हार्दिक पांड्याची 5 कोटी किमतींची 2 घड्याळं कस्टमच्या ताब्यात
Hardik Pandya: कोरोनामुळं टी-20 विश्वचषक 2021 युएईमध्ये आयोजित करण्यात आले होते.
Hardik Pandya: कोरोनामुळं टी-20 विश्वचषक 2021 युएईमध्ये (T20 World Cup 2021) आयोजित करण्यात आले होते. आयसीसी स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याही (Hardik Pandya) संघासह काल रात्री उशिरा मायदेशात परतला. मात्र, विमानतळावर पोहचल्यानंतर कस्टमनं हार्दिक पांड्याची 5 कोटी किंमतीची 2 घड्याळं ताब्यात घेतली आहे. हार्दिक पांड्याकडे या घड्याळाचे इनवॉइस नव्हते. तसंच त्यानं या घड्याळांची कोणताही माहिती दिली नसल्याचं सागण्यात आलंय.
टी-20 विश्वचषक 2021 च्या स्पर्धेत भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. ज्यामुळे भारतीय संघाला सेमीफायनलमध्येही प्रवेश मिळवता आला नाही. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं न्यूझलंडचा धुव्वा उडवत पहिल्यांदाच विश्वचषकाचा खिताब जिंकलाय. या स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ काल रात्री उशीरा मायदेशात परतलाय. त्यावेळी कस्टमला हार्दिक पाड्याकडं तब्बल 5 कोटी रुपये किंमतीची 2 घड्याळं आढळली. परंतु, हार्दिककडं या घड्याळ्यांची पावती नाही. तसेच त्यानं या घड्याळ्यांचा कस्टम वस्तूंमध्ये समावेशही केला नाही. ज्यामुळं कस्टमनं ही दोन्ही घड्याळं ताब्यात घेतली आहे.
दरम्यान, हार्दिक पांड्या मायदेशात परत असताना त्याच्याकडं महागडी घड्याळ सापडल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. टी-20 विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याकडं ही घड्याळं कशी आली? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर, हार्दिक पांड्याला आतापर्यंत अटक का नाही झाली? असंही एका नेटकऱ्यानं म्हटलंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-