Rohit Sharma : रोहित शर्मा आरसीबीत आला तर हेडलाईन काय असेल? हिटमॅन अन् मुंबईच्या कनेक्शनवर एबी डिविलियर्सचं मोठं वक्तव्य
Rohit Sharma : 2025 च्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा कोणत्या संघाकडून खेळणार अशा चर्चा सुरु होत्या. आता त्यावर दक्षिण आफ्रिका आणि आरसीबीचा खेळाडू एबी डिविलियर्सनं मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : टीम इंडियाच्या कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुढील वर्षीचं आयपीएल कोणत्या संघाकडून खेळणार अशा चर्चा सुरु आहेत. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्यावर मुंबई इंडियन्सच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, 2024 च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला अपेक्षेप्रमाणं कामगिरी करता आली नव्हती. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा लखनौ सुपर जाएंटसकडून खेळू शकतो अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चांवर आरसीबी आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिविलियर्सनं प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मा आरसीबीच्या संघात आला तर काय हेडलाईन असेल असा सवाल डिविलियर्सनं केला.
काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये रोहित शर्मा पुढील आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंटसकडून खेळेल असा दावा करण्यात आला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा माजी खेळाडू एबी डिविलियर्सनं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना एक मोठा दावा केला आहे. त्यामुळं रोहित शर्मासंदर्भातील चर्चांना वेगळं वळण मिळालं आहे.
एबी डिविलियर्स त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला की, रोहित शर्मा संदर्भातील चर्चांवर मला हसू आलं होतं. जर रोहित शर्मा आरसीबीमध्ये जाणार असेल तर ती सर्वात मोठी बातमी असेल, विचार करा हेडलाईन काय असेल. ही हार्दिक पांड्यानं संघ सोडण्यापेक्षा मोठी बातमी असेल. हार्दिक पांड्या गुजरातमधून मुंबईत परत ला होता. ते काही मोठं सरप्राइज नव्हतं. मात्र, रोहित शर्मा आरसीबीमध्ये येत असेल तर ती मोठी बातमी असेल, असं डिविलियर्सनं म्हटलं. मात्र, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडेल असं वाटत नाही. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडण्याची शक्यता केवळ 0.1 टक्के असेल असंही त्यानं म्हटलं. ."
आरसीबीचा कॅप्टन कोण असेल?
आरसीबीला आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही.विराट कोहलीनं कर्णधारपद सोडल्यानंतर फाफ डु प्लेसिस आरसीबीचा कप्तान आहे. आरसीबीचं 2024 च्या आयपीएलमध्ये नेतृत्त्व फाफ डु प्लेसिसनं केलं आहे. डु प्लेसिसचं सध्या वय 40 वर्ष आहे. मात्र, त्याचं वय 40 वर्ष होणं हा काही मुद्दा नाही. त्यानं गेल्या काही हंगामामध्ये दमदार कामगिरी केलेली आहे. आरसीबीनं आतापर्यंत एकदाही ट्रॉफी जिंकली नाही याचं दडपण फाफ डु प्लेसिसवर राहिलेलं आहे. विराट कोहली देखील फाफ डु प्लेसिसला सहकार्य करेल, असं एबी डिविलियर्स म्हणाला.
इतर बातम्या :