एक्स्प्लोर

एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या

मानेवर धारदार शस्त्राच्या खुणाही आढळून आल्या. घराचे गेट बाहेरून बंद होते. सकाळपासून नातेवाईक आणि भाऊ फोन करत होते, मात्र फोन येत नव्हते. शेजाऱ्यांनीही एक दिवस कुटुंबाला पाहिले नव्हते.

Murder of Family : एकाच कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. घरात पती-पत्नीचे मृतदेह चादरीत गुंडाळलेले आढळले. त्यांच्या तीन मुलींना मारून पोत्यात भरून, नंतर बेड बॉक्समध्ये ठेवले होते. सर्वांच्या डोक्यावर खोल जखमा आहेत. मानेवर धारदार शस्त्राच्या खुणाही आढळून आल्या. घराचे गेट बाहेरून बंद होते. सकाळपासून नातेवाईक आणि भाऊ फोन करत होते, मात्र फोन येत नव्हते. शेजाऱ्यांनीही एक दिवस कुटुंबाला पाहिले नव्हते. उतर प्रदेशातील मेरठमधील लिसाडी गेट परिसरातील सोहेल गार्डनमध्ये हा प्रकार घडला. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पती मोईन, पत्नी अस्मा आणि 3 मुली - अफसा (8), अजीजा (4) आणि अदीबा (1) यांचा समावेश आहे. मोईन हा मेकॅनिक म्हणून काम करत होता, अस्मा त्याची तिसरी पत्नी होती. पोलिस आणि फॉरेन्सिक टीमने घराची झडती घेतली. एडीजी डीके ठाकूर आणि डीआयजी कलानिधी नैथानीही पोहोचले. प्राथमिक तपासात मोईनच्या भावावर हत्येचा संशय आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एक डॉक्टरही रडारवर आहे.

एक खोली, एक बेड आणि जमिनीवर मृतदेह

मोईन हा भाड्याच्या घरात राहत होता. दरवाजा तोडून भाऊ आत पोहोचला. कपडे आणि सामान जमिनीवर विखुरले होते. दारासमोरच एक खोली होती, जवळच एक छोटेसे स्वयंपाकघर होते. खोलीतील जमिनीवर, बेडजवळ, मोईन आणि त्याच्या पत्नीचे मृतदेह, चादरीमध्ये होते. धारदार शस्त्रांनी त्यांचा गळा चिरला होता. जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता. मुलींचे मृतदेह बेडच्या आत लपवून ठेवले होते. हे मृतदेह पोत्यात होते. आतमध्ये रक्ताचा सडा होता.

भाऊ घरी पोहोचल्यावर हा प्रकार उघडकीस आला

जेव्हा मोईनचा भाऊ सलीम त्याच्या पत्नीसह घटनास्थळी पोहोचला तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. घराचा दरवाजा बाहेरून बंद होता. सलीम म्हणाला की, मला माझ्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले. डॉक्टरांना पाहून मी मोईनच्या घरी पोहोचलो. दरवाजा बाहेरून बंद होता. मी बाहेरून आरडाओरडा केला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. सामान सर्वत्र विखुरले होते. भाऊ आणि वहिनीचे मृतदेह जमिनीवर पडले होते. जवळ जाऊन पाहिलं तर तो मयत झाला होता.

भाची म्हणाली, आम्ही काल रात्री नऊ वाजता बोललो

भाची तरन्नुमने सांगितले की, आम्ही कालपासून काकाचा (मोईन) शोध घेत होतो. तो कुठेतरी गेला असावा असे आम्हाला वाटले. त्यांच्यात भांडणेही होत होती. काल रात्री नऊ वाजता काकांशी फोनवर बोललो. सगळं नॉर्मल होतं. मला माहित नाही, मग काय झाले? आमचं घर थोडं अंतरावर आहे, घराला बाहेरून कुलूप होतं.

2009 मध्ये रुरकीला गेले, दीड महिन्यापूर्वी येथे राहायला आले

हत्येची माहिती मिळताच मोईनचा शेजारी मोहम्मद वसीम तेथे पोहोचला. तो म्हणाला की, 2009 पर्यंत मोईन आपल्या कुटुंबासह झाकीर कॉलनीतील मक्का मदिना मशिदीच्या गल्लीत राहत होता. मोईनचे सर्व भाऊ गवंडी म्हणून काम करतात. मोईन मवाना आणि रुरकी येथेही राहत होता. हे कुटुंब दीड महिन्यापूर्वीच येथे आले होते. हे लोक अतिशय साधे होते. कुटुंबात कोणाशीही वाद नव्हता.

आसमा ही मोईनची तिसरी पत्नी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोईनचे तीन लग्न झाले होते. सुमारे 15 वर्षांपूर्वी त्याने जफ्रा नावाच्या मुलीशी पहिले लग्न केले. इल्मान या मुलीला जन्म दिल्यानंतर तिचे निधन झाले. सध्या मुलगी किठोरे येथे मावशीकडे राहते. 11 वर्षांपूर्वी मोईनने नाराशी दुसरे लग्न केले. मात्र रोजच्या भांडणानंतर तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने अस्माशी लग्न केले. अस्मा आधीच विवाहित होती. अस्माला तीन मुली होत्या. मोईनच्या लहान मुलींची प्रकृती ढासळत चालली होती, असे लोकांचे म्हणणे आहे. एक मौलवी घरी भेट देणार होता. पोलिसांनी मोईनच्या भावाला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर खुनाचाही संशय व्यक्त केला जात आहे. एक डॉक्टरही संशयाच्या भोवऱ्यात आहे. मोईनने त्याच्याकडून औषधे विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget