Aaron Finch Retires : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! आरोन फिंच निवृत्त
Aaron Finch Retirement: भारत आणि ऑस्ट्रेलिया 9 फेब्रुवारीपासून कसोटी सामन्यांना सुरुवात होत असून त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार आरोन फिंचने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Aaron Finch Retirement : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचनं (Aaron Finch) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानकपणे निवृत्ती जाहीर केली आहे. याआधी मागील वर्षीच त्याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला होता, पण आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवार म्हणजेच 9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या मैदानावर सुरुवात होणार आहे, पण त्याआधीच कांगारू संघाचा माजी कर्णधार फिंचने आज (7 फेब्रुवारी) सकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा एक यशस्वी कर्णधार म्हणून फिंचला ओळखलं जातं. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने 2021 साली पहिल्यांदाच T20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर, कांगारू संघाने 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषकही जिंकला. आक्रमक फलंदाज असलेल्या फिंचने आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ 5 कसोटी सामने खेळले आहेत. फिंचने निवृत्तीबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "मला हे जाणवत आहे की मी 2024 साली होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे." तो पुढे म्हणाला, "मी ऑस्ट्रेलियन खेळाडू, माझा संघ, कुटुंब आणि पत्नी यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी मला सतत साथ दिली. त्याचवेळी, मी माझ्या चाहत्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या सतत पाठिंब्यामुळे.” 2021 साली T20 विश्वचषक आणि 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणं या माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आठवणी असतील. त्याने सोशल मीडिया पोस्ट करत निवृत्तीची माहिती दिली आहे.
View this post on Instagram
फिंचच्या कारकीर्दीवर थोडक्यात नजर
फिंचने कर्णधारपद भूषवत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघाला T20 विश्वचषक जिंकवून दिला. फिंचच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्याने 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 शतकांसह 38.89 च्या सरासरीने एकूण 5406 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, फिंचने 103 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34.29 च्या सरासरीने 3120 धावा केल्या आहेत, ज्यात 2 शतकांचा समावेश आहे. याशिवाय फिंचने कांगारू संघासाठी 5 कसोटी सामनेही खेळले आहेत, परंतु यामध्ये तो खास कामगिरी करु शकला नाही. फिंचने कसोटीच्या 10 डावांमध्ये 27.08 च्या सरासरीने केवळ 278 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 2 अर्धशतकांची नोंद आहे.
हे देखील वाचा-