एक्स्प्लोर

1983 World Cup Win : भारताच्या ऐतिहासिक कामगिरीला 40 वर्ष पूर्ण! आजच्या दिवशी विश्वचषक उंचावून रचला होता इतिहास

1983 World Cup Win : कोणताही भारतीय क्रिकेट चाहता आजचा दिवस विसरू शकणार नाही. कारण क्रिकेटविश्वात आजच्या दिवशी 40 वर्षांपूर्वी भारतानं पहिला विश्वचषक जिंकून क्रिडाविश्वावर छाप सोडली.

1983 World Cup Win : कोणताही भारतीय क्रिकेट चाहता आजचा दिवस विसरू शकणार नाही. कारण क्रिकेटविश्वात आजच्या दिवशी 40 वर्षांपूर्वी भारतानं पहिला विश्वचषक जिंकून क्रिडाविश्वावर छाप सोडली. भारतानं आजच्या दिवशी म्हणजे 25 जून 1983 रोजी लॉर्ड्समध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजच्या (West Indies) संघाला धुळ चाखली. भारतीय संघाची 1983 विश्वचषकामधील परिस्थिती अत्यंत नाजूक होती. भारताला अनेकदा दुबळ्या संघांना तोंड देण्यासाठी सुद्धा मेहनत घ्यावी लागली. मात्र, भारताच्या शिलेदारांनी भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात आणि आपल्या मेहनतीच्या बळावर 1983 च्या विश्वचषकावर नाव कोरलं.

भारताला विश्वचषक जिंकून देणारा कपिल देव पहिला कर्णधार
भारताचा माजी कर्णधार कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं 1983 मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक जिंकलाय. 1983 च्या विश्वचषकात भारतानं चमकदार कामगिरीच्या जोरावर बलाढ्य संघ वेस्ट इंडीजचा  दबदबा संपवला. भारताला विश्वचषक जिंकून देणारा कपिल देव पहिला कर्णधार ठरला. कपिल देवनंतर भारताला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारा महेंद्र सिंह धोनी दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. 

भारतानं वेस्ट इंडिजचं वर्चस्व संपवलं
क्रिकेटविश्वात वेस्ट इंडीजनंतर भारत दुसरा मजबूत संघ म्हणून समोर आला. विश्वचषकात फक्त वेस्ट इंडीजच्या संघानेच पहिल्या दोन ट्रॉफी जिंकून क्रिडाविश्वात आपलं वर्चस्व बनवलं. परंतु, 1983 मध्ये भारतानं विश्वचषक जिंकून वेस्ट इंडीजचं तिसऱ्या विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मोडलं.

कपिल देव यांची नाबाद 175 धावांची खेळी
1983 च्या विश्वचषकात भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात 18 जून रोजी टुनब्रिज वेल्स मैदानावर सामना खेळण्यात आला होता. हा सामना भारतानं 31 धावांनी जिंकला होता. भारताच्या या विजयात कर्णधार कपिल देव यांचं मोलाचं योगदान होतं. या सामन्यात त्यांनी नाबाद 175 धावांची खेळी करत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं.परंतु दुर्दैवानं भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी कपिल यांची खेळी कॅमेऱ्यात कधीच रेकॉर्ड झाली नाही. कारण त्यावेळी देशातील एकमेव प्रसारक बीसीसीनं देशव्यापी संप पुकारला होता. ज्यामुळं कपिल देव यांची ही खेळी कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली नव्हती. 

कपिल देव यांची क्रिकेट कारकिर्द
कपिल देव यांनी भारताकडून 1970  भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण केलं. त्यांनी 1994 मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळला. यादरम्यान त्यांनी अनेक अविश्वसनीय खेळी केल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अष्टपैलू कामगिरी करताना 225 एकदिवसीय सामन्यात 253 विकेट्स आणि3 हजार 783 धावा केल्या आहेत. तर, कसोटीमध्ये त्यांनी 131 सामन्यात 434 विकेट्स आणि 5 हजार 248 धावा केल्या आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीLadki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
सैफच्या पाठीत खुपसलेल्या चाकूचा EXCLUSIVE फोटो अन् हल्लेखोराचं नवं CCTV फुटेज समोर
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Embed widget