CWG 2022 Hockey: भारतीय महिला हॉकी संघाची दमदार सुरुवात, पहिल्याच सामन्यात घानावर 5-0 ने विजय
IND vs GHA : भारतीय महिला हॉकी संघाने कॉमनवेल्थ गेम्समधील पहिल्याच सामन्यात घानावर दमदार असा 5-0 ने विजय मिळवला. यावेळी गुरजीत कौरने सर्वाधिक दोन गोल केले.
Commonwealth Games 2022 : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) पहिल्या दिवशी भारताने क्रिकेट सोडता बहुतांश मोठ्या स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. यावेळी भारतीय महिला हॉकी संघाने घानाला (India vs Ghana) 5-0 च्या तगड्या फरकाने मात देत स्पर्धेत पहिला-वहिला विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताची अनुभवी हॉकीपटू गुरजीत कौरने सर्वाधिक दोन गोल केले.
FULL-TIME 😍#WomenInBlue cruised past Ghana with a 5-star display to register a big win in their first game of the Birmingham 2022 Commonwealth Games!#IndiaKaGame #HockeyIndia #B2022 #Birmingham2022 @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/R1SLddF5NP
— Hockey India (@TheHockeyIndia) July 29, 2022
भारत विरुद्ध घाना सामन्यात सुरुवातीपासून भारताने आपलं वर्चस्व ठेवलं होतं. सुरुवातीच्या काही मिनिटांतच संघातील एक अनुभवी खेळाडू असणाऱ्या गुरजीत कौरने अप्रतिम गोल करत भारताला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने एक-एक करत घानाच्या गोलपोस्टवर हल्ला चढवणं कायम ठेवलं. अखेरच्या काही मिनिटांपर्यंत भारतीय महिला गोल करत होत्या. अखेरच्या काही मिनिटांत सलिमा टेटे हिने गोल करत भारताची आघाडी 5-0 वर पोहोचवली. ज्यानंतर सामन्याची वेळ संपली आणि भारत 5-0 ने विजयी झाला. यावेळी सामन्यात गुरजीत कौरने सर्वाधिक 2 तर नेहा गोयल, संगीता कुमारी आणि सलिमा टेटे यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला. आताभारत उद्या अर्थात 30 जुलै रोजी वेल्सविरुद्ध आपला दुसरा ग्रुप सामना खेळेल.
बॅडमिंटनमध्ये पाकिस्तानवर 5-0 ने विजय
भारतीय बॅडमिंटनपटूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंना मात 5-0 च्या फरकाने एक दमदार असा विजय मिळवला आहे. यावेळी पीव्ही सिंधू, किदम्बी श्रीकांत अशा दिग्गज बॅडमिंटनपटूंच्या दमदार खेळाच्या भारताने ही कामगिरी केली आहे. भारताच्या सर्वच बॅडमिंटनपटूंनी पाचही सामन्यात सरळ सेट्समध्ये विजय मिळवत पाकिस्तानला मात दिली. यावेळीभारताच्या सुमीत रेड्डी आणि आश्विनी पोनप्पा या जोडीने मिश्र सामन्यात, किदम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत, पीव्ही सिंधूने महिला एकेरीत, सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीत तर ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीत भारताला विजय मिळवून दिला.
हे देखील वाचा-