एक्स्प्लोर

चायनामन बॉलिंग स्टाईल नाही तर शिवी, संपूर्ण कहाणी

मुंबई : कुलदीप यादवच्या कसोटी क्रिकेटमधील पदार्पणानंतर 'चायनामन' गोलंदाज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरंतर 'चायनामन' बॉलिंग स्टाईल नाही तर एक शिवी आहे, जी नंतर गोलंदाजीची एक शैली म्हणून नावारुपास आली आणि क्रिकेटच्या शब्दावलीत सामील झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर फारच कमी गोलंदाज या शैलीसाठी ओळखले जातात. 84 वर्षांपूर्वीचा किस्सा ही घटना 25 जुलै 1933 रोजी घडली आहे. मॅन्चेस्टरमध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीमध्ये सामना सुरु होता. वेस्ट इंडीजकडून डावखुरे फिरकीपटू एलिस एचॉन्ग गोलंदाजी करत होते. एचॉन्ग हे चीनी वंशांचे होते, हे सगळ्यांनाच माहित होतं. त्यांनी असा एक भन्नाट चेंडू टाकला जो ऑफवरुन लेगकडे वळला. इंग्लंडचे फलंदाज वॉल्टर रॉबिन्स यांना टर्न समजला नाही आणि बाद झाले. संतापलेल्या रॉबिन्स यांची प्रतिक्रिया बाद झाल्यानंतर वॉल्टर रॉबिन्स संतापले. पॅव्हिलियनकडे परतताना रॉबिन्स यांनी काही अपशब्द  उच्चारले, त्यामध्ये 'चायनामन' असा शब्द होता. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर रिची बेनो यांनी या गोष्टीचा खुलासा केला. यानंतर एचॉन्ग यांच्या अशा गोलंदाजीला 'चायनामन' म्हणून ओळख मिळाली. 82 वर्षांच्या कसोटी इतिहासातला पहिला चायनामन कुलदीप यादव सोप्या शब्दात 'चायनामन' म्हणजे... कोणत्याही डावखुऱ्या फिरकीपटूने बोटांऐवजी मनगटाने चेंडू वळवला, तर त्याला 'चायनामन' गोलंदाज म्हटलं जातं. चायनामन गोलंदाजाचा चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आतल्या बाजूने वळतो, तर डावखुऱ्या फलंदाजांसाठी बाहेरच्या दिशेने वळतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'चायनामन' गोलंदाज आंतरराष्ट्रीय स्तरावर फारच कमी गोलंदाज आहेत, ज्यांना 'चायनामन' अशी ओळख मिळाली आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पॉल अॅडम्स, ऑस्ट्रेलियाचा मायकल बेवन, सायमन कॅटिच, ब्रॅड हॉग, श्रीलंकेच्या के लक्षण रंगिका यांच्यानंतर आता भारताचा कुलदीप यादव सामील झाला आहे. कुलदीप यादवचा ऑस्ट्रेलियाला दणका ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत दुखापतग्रस्त विराट कोहलीऐवजी भारतीय संघात कुलदीप यादवला संधी देण्यात आली. कुलदीप यादवने या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 'चायनामन' गोलंदाज कुलदीप यादवच्या धडाकेबाज गोलंदाजीमुळे धर्मशाला कसोटीत ऑस्ट्रेलियाला चांगलाचा दणका दिला.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 3rd ODI : आधी दोन पराभव, आता दोन बॉलर्स OUT! भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेआधी न्यूझीलंडची गोलंदाजी खिळखिळी, आता कोण झालं बाहेर?
आधी दोन पराभव, आता दोन बॉलर्स OUT! भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेआधी न्यूझीलंडची गोलंदाजी खिळखिळी, आता कोण झालं बाहेर?
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : टीम इंडियाचा कर्णधार पाकिस्तानच्या खेळाडूच्या सुटलेल्या बूटाची लेस बांधण्यासाठी खाली बसला तेव्हा...; पुढे मैदानात काय घडलं?
टीम इंडियाचा कर्णधार पाकिस्तानच्या खेळाडूच्या सुटलेल्या बूटाची लेस बांधण्यासाठी खाली बसला तेव्हा...; पुढे मैदानात काय घडलं?
IND vs NZ Test Update : भारताच्या कसोटी मालिकेआधी मोठी घडामोड! संघात स्थान नाही, तरीही आकिब नबीसह 3 खेळाडूंना न्यूझीलंडमध्येच थांबणार, BCCIचा नेमका प्लॅन काय?
भारताच्या कसोटी मालिकेआधी मोठी घडामोड! संघात स्थान नाही, तरीही आकिब नबीसह 3 खेळाडूंना न्यूझीलंडमध्येच थांबणार, BCCIचा नेमका प्लॅन काय?
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : एका पराभवाने सगळंच गणित बिघडलं! पाकिस्तानकडून हरल्यानंतर टीम इंडियाची उपांत्य फेरीसाठी आरपारची लढाई, जाणून घ्या समीकरण
एका पराभवाने सगळंच गणित बिघडलं! पाकिस्तानकडून हरल्यानंतर टीम इंडियाची उपांत्य फेरीसाठी आरपारची लढाई, जाणून घ्या समीकरण

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Gokul Kolhapur Dasara Chowk Morcha: गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Gokul Election 2026: सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
Embed widget