एक्स्प्लोर
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच रौप्यपदक
लंडन : भारताला नमवून ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. मात्र असं असलं तरी भारताने रौप्यपदक पटकावलं आहे. तब्बल 34 वर्षांनी भारताने या स्पर्धेत पदकाची कमाई केली आहे.
लंडनमध्ये सुवर्णपदकासाठी झालेल्या या सामन्यात दोन्ही हाफमध्ये एकही गोल झाला नाही. अखेर पेनल्टी शूटआऊटद्वारे सामन्याचा निकाल लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताने हा सामना 1-3 असा गमावला. संपूर्ण सामन्यात भारतीय संघाने कांगारुंना एकही गोल करु दिली नाही. मात्र पेनल्टी शूटआऊटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ वरचढ चढला. ऑस्ट्रेलियाने चौदा वेळा या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी : सुवर्णपदकासाठी भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार
परंतु पराभव झाला तरी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी 1982 साली नेदरलँडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने ब्राँझ मेडल पटकावलं होतं. भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement