एक्स्प्लोर
10 ओव्हरचा सामना, 26 चेंडूत शतक आणि सलग सहा षटकार
शाहिद आफ्रिदी चॅरिटी फाऊंडेशन सामने सध्या सुरु आहेत, जे 10-10 षटकांचे आहेत. यामध्ये सलग सहा षटकार आणि वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायचा असेल तर आता 10 षटकांचे सामने ही क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदी चॅरिटी फाऊंडेशन सामने सध्या सुरु आहेत, जे 10-10 षटकांचे आहेत. यामध्ये सलग सहा षटकार आणि वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम करण्यात आला आहे.
पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकने एकाच षटकात सलग सहा षटकार ठोकले. तर बाबर आजमने 26 चेंडूतच वेगवान शतक पूर्ण केलं. शोएब मलिक एसएएफ रेड टीमकडून खेळत होता. 6 षटकांमध्ये 104 धावा झाल्या होत्या. तेव्हाच शोएब मलिक फलंदाजीसाठी आला आणि त्याने सलग सहा षटकार ठोकले. 10 षटकांमध्ये मलिकच्या संघाने 210 धावा केल्या.
एसएएफ रेडनंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या एसएएफ ग्रीननेही दमदार फलंदाजी केली. बाबर आजमने केवळ 26 चेंडूत शतक पूर्ण केलं, तर विजयी चौकार शाहिद आफ्रिदीने मारला.
बाबर आजमने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतही भारताविरुद्ध 52 चेंडूत 46 धावा केल्या होत्या. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 36 वन डे सामन्यात 1758 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये सात शतकं आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement