Team India Caption : कॅप्टन रोहित शर्माचे स्थान डळमळीत, सुनील गावस्करांनी टीम इंडिया भविष्यातील सरसेनापतीचं थेट नाव सांगितलं!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावल्यानंतर रोहित शर्माचे कर्णधारपद धोक्यात आले आहे, कारण तो काही काळापासून धावा करू शकला नाही. बीजीटीमध्ये रोहितने केवळ 31 धावा केल्या.
Sunil Gavaskar on Team India Caption : महान कसोटीवीर आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय कसोटी संघाचा पुढील कर्णधार असल्याची भविष्यवाणी केली आहे. 75 वर्षीय गावस्कर यांनी चॅनल 7 ला सांगितले की,'मला वाटते की तो पुढील व्यक्ती (कर्णधार) होऊ शकतो. कारण तो समोरून नेतृत्व करतो. त्याची लीडरची प्रतिमा चांगली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बुमराहने टीम इंडियाचे नेतृत्व केले. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने 295 धावांनी विजय मिळवला होता. तर सिडनी कसोटीत त्यांना 6 विकेट्सचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 3-1 ने जिंकली.
बुमराह कर्णधारपदाचा दावेदार
जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. त्याने 32 विकेट घेतल्या होत्या. त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणूनही निवडण्यात आले. बीजीटीमध्ये बुमराहच्या दमदार कामगिरीमुळे त्याचा समावेश कर्णधारपदाच्या दावेदारांमध्ये झाला आहे.
रोहित शर्माचे कर्णधारपद धोक्यात
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावल्यानंतर रोहित शर्माचे कर्णधारपद धोक्यात आले आहे, कारण तो काही काळापासून धावा करू शकला नाही. बीजीटीमध्ये रोहितने केवळ 31 धावा केल्या. अशा परिस्थितीत त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी होत आहे. या मागणीदरम्यान गावस्कर यांनी थेट नाव सांगितलं आहे.
सुनील गावस्कर नेमकं काय म्हणाले?
तो (बुमराह) पुढचा माणूस (कर्णधार) होऊ शकतो. मला वाटते की तो पुढचा माणूस (कर्णधार) असेल. कारण, तो समोर येत नेतृत्व करतो. त्याच्यात एका लीडरची प्रतिमा आहे. तो (बुमराह) तुमच्यावर दबाव टाकणारा नाही. काही वेळा तुमच्याकडे कर्णधार असतात जे तुमच्यावर खूप दबाव टाकतात. खेळाडूंनी आपले काम करावे अशी त्याची अपेक्षा आहे. त्याच्यावर अतिरिक्त दबाव आणू नका. बुमराह वेगवान गोलंदाजीच्या बाबतीत उत्कृष्ट आहे. तो मिड-ऑफ आणि लाँग-ऑफमध्ये उभा राहतो आणि इतर बॅलर्ड्सना मार्गदर्शन करतो. मला वाटते की, त्याने लवकरच कर्णधारपद स्वीकारले तर मला आश्चर्य वाटणार नाही.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत विश्रांती शक्य
इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून त्याला सूट देण्यात येत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चार सामन्यांमध्ये त्याने 141.2 षटके टाकली आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येत आहे. संघाला येथे 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय मालिका खेळायची आहे. ही मालिका 22 जानेवारीपासून सुरू होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या