एक्स्प्लोर
बॉल टॅम्परिंग माझ्यामुळे झाली, वॉर्नरच्या पत्नीचं विधान
दक्षिण आफ्रिकेत माझ्यावर झालेल्या वैयक्तिक टीकेचा बदला घेण्यासाठी पती डेव्हिड वॉर्नरने हे पाऊल उचललं, असं कॅन्डिस म्हणाली.
सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. बॉल टॅम्परिंगची संपूर्ण घटना माझ्यामुळे घडली, असं धक्कादायक विधान ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरची पत्नी कॅन्डिस वॉर्नरने केलं. दक्षिण आफ्रिकेत माझ्यावर झालेल्या वैयक्तिक टीकेचा बदला घेण्यासाठी पती डेव्हिड वॉर्नरने हे पाऊल उचललं, असं कॅन्डिस म्हणाली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान, कॅन्डिस वॉर्नरची थट्टा करण्यात आली होती. तीन चाहत्यांनी कॅन्डिसची खिल्ली उडवण्यासाठी रग्बी खेळाडू सोनी बिल विल्यम्सचे मुखवटे घातले होते. त्यांच्यासोबत क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे दोन वरिष्ठ खेळाडूही उपस्थित होते. वॉर्नरशी लग्न करण्यापूर्वी 2007 साली कॅन्डिस आणि सोनी बिल विल्यम्स यांचा पुरुषांच्या बाथरुममधील फोटो व्हायरल झाला होता.
तीन प्रेक्षक हा सर्व प्रकार करत चिडवत होते आणि ते गप्प सहन केलं, असा दावा कॅन्डिसने केला. अपमानाचा बदला घेण्यासाठी वॉर्नरने हे सगळं केलं. मात्र या प्रकाराचा आपल्याला मनापासून त्रास होत असून अस्वस्थ वाटत आहे, असंही कॅन्डिस म्हणाली.
दरम्यान, या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपासूनच उभय संघांमधील संबंध तणावाचे होते. पहिल्या कसोटीदरम्यान, वॉर्नर आणि दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर क्विंटन डी कॉक एकमेकांशी भिडले होते. डी कॉकने वॉर्नरच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे हा वाद झाल्याचं बोललं जात होतं. या घटनेचा व्हिडीओही समोर आला होता.
काय आहे प्रकरण?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (तिसऱ्या) केपटाऊन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कॅमेरुन बॅनक्रॉफ्टला चेंडू अवैधरित्या हाताळताना टेलिव्हिजन कॅमेरानं रंगेहाथ पकडलं होतं. त्यानंतर स्मिथने याची कबुली देताना हा रणनीतीचाच एक भाग होता, असं मान्य केलं होतं.
बॅनक्रॉफ्टचं चेंडू अवैधरित्या हाताळणं कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या चांगलंच अंगाशी आलं. स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिल्यानंतर कर्णधार स्मिथ आपल्या पदावरुन पायउतार झाला, तर डेव्हिड वॉर्नरनेही उपकर्णधारपदाचा राजीनामा दिला.
आयसीसीने स्मिथवर सामना मानधनाच्या शंभर टक्के दंड ठोठावला आणि एका कसोटी सामन्याची बंदीही घातली. तर बॅनक्रॉफ्टला 75 टक्के दंड ठोठावला असून तीन डिमेरीट्स पॉईंट देण्यात आले. तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ आणि वॉर्नरवर बारा महिन्यांची बंद घातली.
संबंधित बातम्या :
व्हॅसलिन ते बॉल टॅम्परिंग, क्रिकेटमधील बदमाशीचा इतिहास
चेंडूशी छेडछाड, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेऱ्यात कैद
तोंडं पाहून न्याय का? हरभजनचा आयसीसीला खडा सवाल
स्मिथ आणि वॉर्नरचं आधीच ठरलं होतं, बॉल टेम्पर करायचा!
'या' पठ्ठ्याने बॉल टेम्परिंग प्रकरण समोर आणलं
क्रिकेट विश्वातील बॉल टेम्परिंगच्या पाच घटना
स्टीव्ह आणि कॅमेरुनवर अखेर आयसीसीकडूनही कारवाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement