एक्स्प्लोर
Advertisement
तिसऱ्या वनडे सामन्यात भुवनेश्वर आणि रिषभ पंतची एंट्री होणार?
शुक्रवारी रांचीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघात दोन बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रांची : शुक्रवारी रांचीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघात दोन बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संधी मिळू शकते.
गुरुवारी मोठ्या कालावधीनंतर भुवी (भुवनेश्वर कुमार) संघासोबत सराव करताना पाहायला मिळाला. भुवनेश्वरने दिवसभर गोलंदाजीचा सराव केला. त्यामुळे शुक्रवारच्या सामन्यात जसप्रीत बुमराहऐवजी भुवनेश्वरला संधी मिळू शकते.
भुवीसोबत रिषभ पंतही यावेळी सराव करताना पाहायला मिळाला, तिसऱ्या वनडेमध्ये पंतदेखील खेळू शकेल. परंतु पंतला कोणाच्या जागी संघात घेतले जाईल, हा प्रश्नच आहे. विश्वचषकापूर्वीची शेवटची एकदिवसीय मालिका असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन सर्व खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शुक्रवारी पंत आणि भुवीला संधी मिळू शकते.
पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतले पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. शुक्रवारचा रांचीतला सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल. तसेच हा सामना महेंद्रसिंह धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतला होम ग्राऊंडवरचा शेवटचा सामना ठरू शकतो. त्यामुळे हा सामना धोनीसाठी विशेष असेल.
Gearing up for Ranchi - ???????? from #TeamIndia's training session before the 3rd ODI against Australia #INDvAUS @Paytm pic.twitter.com/WstXhrRa9T
— BCCI (@BCCI) March 7, 2019
Who could hit the longest SIX? Here's a look at #TeamIndia's fun SIXES challenge at the nets during training in Ranchi #INDvAUS ???????? @Paytm pic.twitter.com/syd7YSa3Wu
— BCCI (@BCCI) March 7, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement