एक्स्प्लोर
थरारक सामन्यात बंगळुरु बुल्सचा पुण्यावर निसटता विजय
रोहित कुमार आणि मोहिम चिल्लरच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर प्रो कबड्डीत बंगळुरू बुल्सनं पुणेरी पलटणवर 29-27 असा दोन गुणांनी निसटता विजय मिळवला.
या सामन्याचं अखेरचं मिनिट शिल्लक असताना पुणेरी पलटणकडे 26-25 अशी आघाडी होती. पण रोहित कुमारनं एकाच चढाईत तीन गुणांची वसूली करून बंगळुरु बुल्सला 28-26 अशी दोन गुणांची आघाडी मिळवून दिली. मग सोनू नरवालनं पुणेरी पलटणला चढाईत आणखी एक गुण मिळवून दिला. पण सामन्यातल्या अखेरच्या चढाईत रोहित कुमारनं एक गुण मिळवून बंगळुरु बुल्सला दोन गुणांनी विजय मिळवून दिला.
बंगळुरु बुल्ससाठी रोहित कुमारनं आठ, तर मोहित चिल्लरनं सात गुणांची कमाई केली. पुणेरी पलटणसाठी रविंदर पहलनं सहा गुण वसूल केले. बंगळुरु बुल्सचा चार सामन्यांमधला हा दुसरा विजय ठरला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement